लोकशाही दिन ३ नोव्हेंबरला

लोकशाही दिन ३ नोव्हेंबरला

Published on

लोकशाही दिन ३ नोव्हेंबरला
रत्नागिरी : ‘दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. नोव्हेंबरचा लोकशाही दिन ३ तारखेला दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात,’ असे प्र. उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळवले आहे.

सैनिक शाळा प्रवेशासाठी ३० पर्यंत मुदत
रत्नागिरी ः ‘सैनिक स्कूल सोसायटी-२०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी देशभरातील सैनिक शाळा/नवीन सैनिक शाळांमध्ये सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेशपरीक्षा (एआयएसएसईई)-२०२६ आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी ३० ऑक्टोबरपर्यंत  https://exams.nta.nic.in/sainik-school-society/ वर ऑनलाइन अर्ज करावा. परीक्षा शुल्क गेटवे, डेबिट/कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग/यूपीआय वापरून ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी एनटीए ई-मेल आयडी aissee@nta.ac.in व एनटीए हेल्पडेस्कला कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क करावा,’ असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय संरक्षण समितीची २८ ला सभा
रत्नागिरी ः ‘जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक सभा २८ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालय येथे पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षणसंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी बैठकीला आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहित वेळेत उपस्थित राहावे,’ असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com