रत्नागिरी-सदर
गावच्या मालका .........लोगो
सांताकृझजवळ बेस्टची बस आली असताना एक विमान टेकऑफ करत होते हे बघून शशीमामाने ड्रायव्हरला ओरडून सांगितले, तात्या बस थांबव. बस थांबताच आईला म्हणाला, ताई झटकन खाली उतरा विमान बघायला. आम्ही खाली उतरलो अन ते विमानड्डणाचे दृष्य डोळे भरुन पाहिले. गाडीतील पॅसेंजर उशीर होतोय म्हणून ओरडायला लागल्यावर शशीदादा त्यांना म्हणतो, अरे दादानो माझी बहीण आणि तिची मुले कोकणातून आल्येत. त्याना विमान बघायचेय म्हणून जरा कळ काढा. लोकही त्याच्या या आर्जवाला बळी पडले, अशी आहे त्याची वागण्याबोलण्याची रित. पुढे आयुष्यात विमानात बसण्याचा योग आला, मात्र शशीदादाने दाखवलेले ते पहिले विमान आजही मनात घर करून आहे.
-rat१८p५.jpg-
25N99356
--आप्पा पाध्ये, गोळवली
---
या शशीच्याही अनेक कला...
दुनियेत अब्जावधी लोक राहतात. त्या सर्वांच्या तळहातावरील रेषा वेगवेगळ्या असतात. अपवादात्मकही दोन माणसांच्या हातावरील रेषा समान नसतात हे सत्य आहे. जगात वावरताना आपल्याला विविध रंगांचे, विविध अंगयष्टीचे, स्वभावाचे, गुणी अवगुणी, अडाणी-विद्वान लोक भेटत असतात. त्यातील सुस्वभावी, गुणी, निडर, आनंदी अन सर्वांवर भरभरून प्रेम करणारा अवलिया म्हणजे आमचा मामा शशीदादा.
आत्ता शशीदादाचे वय असेल त्र्याऐंशी-चौऱ्याऐशी. मात्र उत्साह आहे विशीतला. मुंबईतील गिरगावात त्याचे बालपण गेले. घरच्या गरिबीमुळे माधुकरी मागून शिक्षण घेतले त्याने. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्याला जगाचा बरावाईट अनुभव मिळाला, अन म्हणूनच तो या जगात यशस्वी होऊ शकला अन अनेकाना यशस्वी करू शकला. शिक्षण झाल्यावर तो बेस्टमध्ये नोकरीस लागला. तिथेही त्याने आपल्या अंगभूत गुणांनी नेतृत्व केले अन जॉर्ज फर्नांडीसांच्या, नारायण फेणाणींच्या बरोबरीने कामगारांच्या उत्थानासाठी झटला आयुष्यभर.
आम्हाला मुंबई माहिती नव्हती. त्यावेळी एका लग्नाला माझी आई, बहीण अन मी मुंबईला गेलो होतो. तर शशीदादा आईला म्हणाला की चल ताई तुला अन मुलांना मुंबै दाखवून आणतो. त्याने मग राणीची बाग, म्हातारीचा बुट, गेटवे अशी त्याकाळातील प्रेक्षणीय स्थळे दाखवली. शशीदादा धार्मिक आहेच पण तो त्याचे अवडंबर नाही करत. कडवईत विठोबाच्या उत्सवाला येणं त्याने कधी चुकवले नाही. येताना नाना प्रकारचे फटाके तो आणायचा अन आमच्या ताब्यात द्यायचा. त्याकाळी हजार रुपयांचे तरी फटाके असायचे ते. आम्हाला फक्त केपं अन लवंगी फटाके एव्हढेच माहिती असताना त्यानेच आम्हाला फॅंसी फटाक्यांचे दर्शन घडवले. त्याचे एक काका गिरगावात राहायचे, ते गणपती आणत, मात्र गणपती आणणे अन विसर्जन करणे हे शशीदादाने ते काका असेपर्यंत कर्तव्य भावनेने केले. त्यातही गंमत म्हणजे विसर्जनाच्या दिवशी दुपारी काकांकडे जेवावेच लागायचे. त्यांच्याकडे बेचव जेवण असे, तरीही हा आम्हाला म्हणायचा की दोन घास जेवा. तिथे जरासे अर्धपोटी जेवण झाले की शशीदादा आम्हाला पान खाण्याच्या निमित्ताने खाली नेऊन केळकर हॉटेलात भरपेट जेवू घालायचा. अन मग गणपती विसर्जनाला जाताना हा स्वत: गणपती घ्यायचा. गिरगाव चौपाटीवर जाताना प्रचंड गर्दी. लोक आडवेतिडवे यायचे मग शशीदादा दोन्ही हातात गणपती असल्याने आडवा येणाऱ्याला पायाने बाजूला करायचा.
त्याचा लोकसंग्रह अफाट. त्याने धंद्याउद्योगात अफाट पैसा कमवला अन तो पैसा गरजवंताना निरपेक्ष भावनेने अक्षरशः वाटला. अर्थात ते त्याने बालपणी भोगलेल्या गरिबीमुळेच असावे. हल्लीच तो आजारी पडला. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन करावे लागणार पण हार्ट प्रॉब्लेम असल्याने ते पेशंटला झेपणारे नाही, तेव्हा कॅथेटर लावून आयुष्य कंठावे लागेल तर हा निडर इसम डॉक्टरांना म्हणाला, हे असले जीवन मी जगणार नाही. ऑपरेशन करा मी स्वत: चालत ऑपरेशन थिएटरला येतो स्ट्रेचर नको. त्याच्या पुण्याईने तो खडखडीत बरा झाला त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने विज्ञानावर विजय मिळवला .
(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.