चार शिक्षक प्राथमिक शिक्षक समितीत

चार शिक्षक प्राथमिक शिक्षक समितीत

Published on

चार शिक्षक प्राथमिक
शिक्षक समितीत
लांजा ः लांजा तालुका पंचायत समितीमधील चारही विशेष शिक्षकांनी नुकताच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये जाहीर प्रवेश केला.‌ यामध्ये नेहा साळवी, परमेश्वर राठोड, मोहम्मद मुन्शी व मायादेवी आचार्य या सर्वांनी जाहीर प्रवेश करून समितीचे सभासदत्व स्वीकारले. हा प्रवेश कार्यक्रम जिल्हा शाखेचे सरचिटणीस संतोष पावणे यांच्या मार्गदर्शनाने तालुका शाखेचे अध्यक्ष दिलीप दिवाळे व सचिव दिनेश झोरे यांच्या पुढाकाराने पार पडला.

निवेतील उघड्या
गटाराबाबत निवेदन
साडवली ः रत्नागिरी-देवरूख रस्त्यावरील निवेबुद्रुक येथील गटार पूर्ण होऊन तीन वर्षे झाली आहेत; मात्र हे गटार उघडे असल्याने अपघाताची शक्यता आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेबुद्रुक ग्रामस्थांनी निवेदन दिले. आठ दिवसात संबंधित ठेकेदार वेल्हाळ यांना बोलावून ग्रामस्थांसमवेत कामाची पाहणी करून लगेच दुरुस्ती करून देतो, असा शब्द उपअभियंता वैभव जाधव यांनी ग्रामस्थांना दिला. पाटगाव घाटीचे कामही दिवाळीनंतर लगेच सुरू केले जाईल. नागोबा मंदिराच्या पुढे खचलेल्या मोरीचे काम व पडलेला खड्डा बुजवण्याचे आश्वासन जाधव यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

२१ विद्यार्थी दिव्यांग
प्रमाणपत्रासाठी पात्र
मंडणगड ः तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शोध व तपासणीसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष शिबिर भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात झाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, समग्र शिक्षण विभाग जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातर्फे हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात तालुक्यातील विविध शाळांमधील ७० विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीअंती त्यापैकी २१ विद्यार्थी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मंडणगड न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी अमृता जोशी, मंडणगड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद लोखंडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी सगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, अ‍ॅड. सुमेश घागरूम, डॉ. प्रभाकर भावठाणकर, शिक्षक बोरले, वैभव भोसले व सुनील आईनकर आदी उपस्थित होते.

माखजन हायस्कूलमध्ये
आकाशकंदीलचे प्रात्यक्षिक
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूलमध्ये आकाशकंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक झाले. यामध्ये गुरुकुल विभागप्रमुख संतोष कुलकर्णी व मानसी कोवळे, हर्षदा कदम, आरजू बेग, अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक महादेव परब, पर्यवेक्षक अंबादास घाडगे आदी उपस्थित होते. गुरुकुल पूरक उपक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत प्रशालेतील अन्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विविध आकाराचे आकर्षक आकाशकंदील विद्यार्थ्यांनी बनवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com