पोलिस दलाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण

पोलिस दलाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण

Published on

-rat१८p१२.jpg-
२५N९९३८१
रत्नागिरी ः जिल्हा पोलिसदलाने राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
----
पोलिसदलाच्या उपक्रमांचे लोकार्पण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती ; मिशन प्रतिसाद, मैत्रीचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरी जिल्हा पोलिसदलामार्फत मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मिशन प्रतिसाद, मिशन प्रगती, मिशन मैत्री, मिशन गती, मिशन संवेदना, मिशन परिपूर्ती, मिशन गस्त, मिशन जीवन, डिजिटल गाववारी, मिशन निरीक्षण आणि मिशन फिनिक्स पोलिसदलावरील विश्वास वाढावा यासाठी दलाने हे उपक्रम राबवले.
मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबवण्याबाबत पोलिस विभागाला सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दलातर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, परदेशी नागरिक, तरुण मुले यांच्यासाठी तसेच इतर विविध योजनेद्वारे नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता पोलिसदलाने राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मिशन प्रतिसाद हा उपक्रम तत्काळ ज्येष्ठांना मदत पुरवण्यासाठी, मिशन प्रगतीमध्ये तक्रार नोंदवणाऱ्या तक्रारदारांना त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची माहिती एसएमएसद्वारे पुरवण्यात येते. मिशन गतीमध्ये दाखल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी, मिशन संवेदना यामध्ये महिलांसंदर्भातील दाखल गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून न्यायालयात सादर करणे तसेच गुन्ह्याची दोषसिद्धी प्राप्त करून घेणे, मिशन परिपूर्तीमध्ये डायल ११२ वरून येणाऱ्या कॉलची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारींचे निरसन झाले किंवा नाही याबाबत माहिती घेणे, मिशन गस्तमध्ये पोलिस ठाण्याच्या हद्दीत महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात येणारे बारकोड रात्री गस्त प्रभावी होण्यासाठी तो स्कॅन करणे, मिशन जीवनमध्ये ज्येष्ठ नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे, डिजिटल गाववारीमध्ये जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असणारी गावांची माहिती डिजिटल स्कॅन करून अपडेट करणे, मिशन निरीक्षणामध्ये दलातील सर्व वाहनांचे लोकेशन घेण्यासाठी वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवणे आणि मिशन फिनिक्समध्ये जिल्हा अमली पदार्थ मुक्त करणे, असे विविध उपक्रम पोलिसदलाने राबवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com