अंकुश गावकर यांचे निधन

अंकुश गावकर यांचे निधन

Published on

लोगो ः निधन वृत्त
---
99388

अंकुश गावकर
ओटवणे, ता. १८ ः मूळचे ओटवणे गावठणवाडी येथील रहिवासी व सध्या मुंबई खार पूर्व साईबाबा रोड, जवाहरनगर येथे राहणारे अंकुश शंभा गावकर (वय ६५) यांचे आज सकाळी निधन झाले. ते मालाड येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये ऑपरेटर होते. त्यांना गायनाचीही आवड होती. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, बहीण, भाऊ, भावजय, भावोजी, नातवंडे असा परिवार आहे. अभिजित गावकर यांचे ते वडील, येथील मूर्तिकार सुभाष गावकर यांचे भाऊ, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर यांचे ते चुलत भाऊ होत.
----
99387
काशिबाई माधव
बांदा, ता. १८ ः मडुरा-रेडकरवाडी येथील काशिबाई कृष्णा माधव (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सैनिक चंद्रकांत माधव, यशवंत माधव यांच्या त्या आई होत.

Marathi News Esakal
www.esakal.com