कोमसापच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. चंद्रमोहन देसाई
rat19p5.jpg-
99512
प्रा.चंद्रमोहन देसाई (अध्यक्ष ) राजेंद्र कदम (कार्याध्यक्ष)
कोमसापच्या रत्नागिरी शाखेच्या
अध्यक्षपदी प्रा. चंद्रमोहन देसाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेची नवीन कार्यकारीणी जाहिर झाली असून प्रा. चंद्रमोहन देसाई यांची अध्यक्षपदी तर राजेंद्र कदम यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली.
कोकणच्या साहित्यिक विकासासाठी मधु मंगेश कर्णिक यांच्या कल्पनेतून कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन झाली. अनेक वर्ष उत्तम काम केल्यानंतर अनेक शाखा तयार करण्यात आल्या. शाखा निहाय साहित्य संदर्भात काम करण्यात येते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती नमिता कीर यांची नियुक्ती झाली. त्यानंतर कोमसापच्या रत्नागिरी शाखेच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
रत्नागिरी शाखेसाठी प्रा. चंद्रमोहन देसाई यांची अध्यक्षपदी तर राजेंद्र कदम यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्ष अंजली पिळणकर, सचिव विद्याधर कांबळे, सहसचिव गौरी सावंत, खजिनदार राजेंद्र चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी आनंद शेलार, सदस्य विनायक हातखंबकर, विजय साळवी, डॉ. आनंद आंबेकर, श्रद्धा बोडेकर, शौकत मुकादम, मनोज खानविलकर, रत्नागिरी जिल्हा युवा शक्ती प्रमुख गुरुदेव नांदगावकर यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ही कार्यकारणी २०२५ ते २०२८ या काळासाठी कार्यरत असणार आहे. साहित्य क्षेत्रात सर्वच क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सतत काम करत असणाऱ्या लोकांना एकत्रित येऊन कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये उत्तम काम करण्याची संधी मिळणार आहे.