मेहनतीचा विजय, जिद्दीचा गौरव

मेहनतीचा विजय, जिद्दीचा गौरव

Published on

99583

मेहनतीचा विजय, जिद्दीचा गौरव

विभागीय हॉलिबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलचे दुहेरी यश

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १९ ः सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय हॉलिबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलचे चार संघ सहभागी झाले होते. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात १४ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी सातारा संघावर, तर १७ वर्षे वयोगटातील संघाने रत्नागिरी संघावर मात करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धा ९ व १० ऑक्टोबरला झाल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करत १४ वर्षे मुली व १७ वर्षे मुलींचा संघ विभागस्तरीय सहभागासाठी खेळले. सर्व तृतीय क्रमांक प्राप्त संघांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. १४ वर्षे मुलांच्या गटात गगनेश सारंग, मयूर आडारकर, पृथ्वीराज पवार, हिमांशू रेडकर, भार्गव पेडणेकर, वेदांत शृंगारे, हर्ष प्रभू, रघुनाथ सारंग, चित्रांक प्रभू, कृष्णा पाटकर, रुचीत चव्हाण, विनीत राऊळ, १७ वर्षे मुलांच्या संघात मांगल्य मेतर, यश आरोलकर, ऋग्वेद परब, निखिल राठुळ, श्रेयश घाडी, विराज देसाई, बाळकृष्ण रावले, मिहीर मेस्त्री, सुयश पाटकर, पृथ्वी भगत, आदेश पडते, आर्यन खोबरेकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. १४ वर्षे मुलींच्या संघात सार्थकी फणसेकर, तनवी दाभोलकर, लावण्या पराडकर, आर्या प्रभू, आर्या ठाकूर, शांती मुंडीये, धार्मिक गोसावी, आरोही पाटकर, खुशी कोचरेकर, आदिती घाडी, निधी चव्हाण तर १७ वर्षे मुलींच्या संघात गायत्री चीपकर, धनदा सावंत, श्रेया सागवेकर, वैभवी केळुसकर, वेदिका गोसावी, लावण्या मेस्त्री, शिवानी सर्वेकर, सिया मयेकर, चिन्मयी सखरे, कोमल कुडव या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. सर्व संघांना मुख्याध्यापक राजन हंजनकर, क्रीडा शिक्षक संजय पवार, दादू कुबल, राष्ट्रीय खेळाडू रुपेश कोनकर, चारुहास वेंगुर्लेकर आदींचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष डी. ए. सामंत, चेअरमन देवदत्त साळगावकर, संस्था सचिव विजय ठाकूर, संचालक अवधूत रेगे, राजेश सामंत, सुधीर मळेकर, दीपक पाटकर, महेश ठाकूर, तसेच पर्यवेक्षक बोंदर आदींनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com