सायबर गुन्ह्यांपासून सतर्क रहा

सायबर गुन्ह्यांपासून सतर्क रहा

Published on

swt203.jpg
99747
कोळंबः ज्येष्ठ नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने दिवाळी भेट देण्यात आली. (छायाचित्रः प्रशांत हिंदळेकर)

सायबर गुन्ह्यांपासून सतर्क रहा
मारुती जगतापः कोळंब येथे ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहणे काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर उतारवयात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी कोळंब येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात केले.
पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस ठाण्याच्या वतीने ‘संवादातून आधार'' या विषयावर आधारित ज्येष्ठ नागरिकांसाठी कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक कदम, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रवींद्र वराडकर, सायबर पोलिस ठाणे सिंधुदुर्गच्या धनश्री परब, निकिता परब, युट्यूबर लकी कांबळी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.
डॉ. पवार म्हणाले, ‘‘महिलांनी स्तनांचा आणि गर्भाशय कर्करोगासारख्या गंभीर आजारांची तपासणी करून घ्यायला हवी. तंबाखूजन्य पदार्थ टाळावेत, वजन कमी करावे आणि नियमित शारीरिक व्यायाम करावा. मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. कौटुंबिक सहभाग महत्त्वाचा आहेच, परंतु कुटुंबातच अडकून न राहता सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. ज्येष्ठांनी आनंदी राहावे, वाचनाचा तसेच इतर छंद जोपासावेत. शासकीय रुग्णालयात अनेक मोफत तपासण्या केल्या जातात. या सुविधेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा.’’
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी, तसेच पोलिस प्रशासनाची जी संकेतस्थळे आणि ॲप्स आहेत, त्यांचा वापर करून कशा तक्रारी कराव्यात, याविषयीची सविस्तर माहिती धनश्री परब यांनी दिली. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते दिवाळी भेटही देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com