‘फॅन्सी नंबर’मधून ९ महिन्यात १.७३ कोटींची कमाई

‘फॅन्सी नंबर’मधून ९ महिन्यात १.७३ कोटींची कमाई

Published on

swt2013.jpg

‘फॅन्सी नंबर’मधून ९ महिन्यात १.७३ कोटींची कमाई
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १,३५० वाहनचालकांनी घेतले पसंतीचे नंबर; सर्वाधिक किंमत अडीच लाख रुपये
नंदकुमार आयरेः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २०ः फॅन्सी नंबरबाबत वाहनधारकांना अधिक आकर्षण असते. या आकर्षणापोटी वाहनधारक ५ हजारांपासून अगदी अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च करतात. हौसेसाठी गेल्या नऊ महिन्यांत जिल्ह्यातील १,३५० वाहनधारकांनी फॅन्सी नंबर खरेदी करून आरटीओ कार्यालयाला १ कोटी ७३ लाख ५४ हजार रुपयांचा महसूल भरला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाड्यांना फॅन्सी नंबर लावण्याची मोठी क्रेझ आहे. यासाठी वाहनधारक कितीही पैसे मोजायला तयार असतात. आपल्या पसंतीचा नंबर मिळवण्यासाठी तब्बल लाखो रुपये खर्च करायलाही ते मागे येत नाहीत. याचा प्रत्यय गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यातील नागरिकांनी घेतलेल्या नंबर प्लेटवरून आला आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला फॅन्सी नंबरच्या शुल्कातून १ कोटी ७३ लाख ५४ हजारांचा महसूल मिळवून दिला आहे.
राज्याच्या परिवहन विभागाने गेल्या वर्षापासून फॅन्सी वाहन क्रमांकाच्या शुल्कात दुपटीने वाढ केली आहे. परिवहन सेवा पोर्टल या वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, आवडीचा फॅन्सी नंबर निवडता येतो. त्यासाठी आवश्यक नोंदणी शुल्क आणि राखीव किंमत भरावी लागते. एकाच नंबरसाठी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले असल्यास बोली प्रक्रिया म्हणजेच ई-लिलाव (e-auction) केला जातो. त्याद्वारे अधिक रक्कम भरणाऱ्या वाहनधारकाला त्याच्या पसंतीचा क्रमांक दिला जातो.

चौकट
०००१ साठी पाच लाख
दुचाकी, तीनचाकी आणि परिवहन वाहनांना ०००१ हा क्रमांक हवा असल्यास त्याचे शुल्क १ लाख, तर याव्यतिरिक्त इतर खाजगी वाहनांना या क्रमांकासाठी ५ लाख रूपये शुल्क द्यावे लागते. तरीही आपल्या पसंतीचा फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चढाओढ दिसून येते. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाला अधिकचा महसूल मिळतो. अशा प्रकारे गेल्या नऊ महिन्यात आरटीओ कार्यालयाकडे तब्बल पावणे दोन कोटीचा महसुल मिळाला आहे.

कोट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहनांना फॅन्सी नंबर लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी वाहनधारक कितीही पैसे मोजायला तयार असतात. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत या कार्यालयाने १,३५० फॅन्सी नंबर प्लेटच्या विक्रीतून १ कोटी ७३ लाख ५४ हजार रुपयांचा महसुल मिळविला आहे.
- विजय काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com