किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण

किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण

Published on

- rat२०p८.jpg -
२५N९९७५९
तिडे तळेघर ः किशोरवयीन मुलामुलींसाठी गुड टच बॅड टच या विषयावर मार्गदर्शन प्रशिक्षण प्रसंगी उपस्थित मान्यवर पालक.

तिडे-तळघर ग्रामपंचायतीतर्फे
किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २० : जळगाव येथील सह्याद्री फाउंडेशन आणि ग्रुप ग्रामपंचायत तिडे-तळेघर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या वित्त आयोगांतून किशोरवयीन मुलामुलींसाठी गुड टच-बॅड टच या विषयावर मार्गदर्शन झाले.
तिडे-तळेघर येथे झालेल्या या प्रशिक्षणावेळी सह्याद्री फाउंडेशनच्या सदस्या आणि प्रा. सुप्रभा सामंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ म्हणजे काय, ते कसे ओळखावे आणि अशा प्रसंगी स्वतःचे रक्षण कसे करावे याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी अशा संवेदनशील विषयांवर मुक्त चर्चा घडवून आणली. या कार्यक्रमात श्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. सुमन व्यास आणि डॉ. श्रद्धा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आजारी विद्यार्थ्यांना आवश्यक औषधांचे वाटपही करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील तिडे नं. १, तिडे बौद्धवाडी, तिडे आदिवासीवाडी, तिडे निमदेवाडी, तिडे उर्दू आणि तळेघर या शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत तिडे-तळेघरच्या सरपंच मुमताज धनसे, उपसरपंच राजेंद्र जाधव, सह्याद्री फाउंडेशनचे अजय पालकर, केंद्रप्रमुख राजेंद्र येरूणकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com