इ पीक ॲपमधील त्रुटी शेतकऱ्यांच्या मुळावर

इ पीक ॲपमधील त्रुटी शेतकऱ्यांच्या मुळावर

Published on

ई-पीक पाहणीत अडथळे, शेतकरी त्रस्त
ॲपमधील तांत्रिक त्रुटीने नोंदी रखडल्या; योजनांचा लाभ धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २० ः जिल्ह्यातील खरीप हंगामात कृषी कर्ज, फळपिक विमा व कृषी विभागाच्या अन्य योजना व सोबतच सातबारा उतारावर पिक पाहणीची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी अत्यावश्यक केली आहे. ही नोंदणी ॲपद्वारे केली जाते. मात्र त्यामधील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांच्या पीक नोंदीत अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या नोंदीसाठी अवघे दहा दिवस असतानाच ॲपमधील सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने नोंदी रखडल्या आहेत.
ई पीक पाहणी ॲपमध्ये गेल्या दोन महिन्यापासून अनेकवेळा त्रुटी निर्माण झालेल्या होत्या. शेतकरीस्तरावरील नोंदी त्या मुदतीत होऊ शकलेल्या नसल्याने आता त्या सहाय्यकस्तरावर केल्या जात आहेत. त्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत दिलेली आहे. परंतु ही मुदत दहा दिवसांनी पूर्ण होणार आहे. संबंधित ॲपमध्ये अनेकवेला लॉग इन होत नाही. काहीवेळा ते झाल्यास शेतकरी नोंदणी होत नाही. नोंदणी केल्यास पुढे त्या शेतकऱ्याचे येणारे क्षेत्र, लागवड क्षेत्राचा प्रत्यक्ष जीपीएस व गुगल मॅप नुसारचा प्रक्षेत्रावरील फोटोचे अंतर हे ॲपमध्ये अचूकपणे येत नाही. या सर्व नोंदीची पूर्तता झालीच, तर ते स्वीकारले जात नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. शासनाने आता पूर्वीसारखे पीक पाहणी ही सातबाऱ्यावर थेट करण्याचे अधिकार बंद केलेले आहेत. या नोंदी शेतकऱ्याने स्वतः किंवा महसूल सहाय्यक स्तरावर जीपीएस प्रणालीद्वारे अचूकता पडताळून करावयाच्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या नोंदी असल्याशिवाय शेतकऱ्यांना संबंधित कृषी कर्ज फळ पिक विमा व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे किमान या सहाय्यकस्तरावरील नोंदीचा कालावधी संपण्याअगोदर महसूल व कृषी विभाग या दोघांनी समन्वयाने या नोंदीसाठी उपाययोजना करून तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
----
कोट
शासनाच्या कृषी व महसूल या दोन विभागांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या पीक पाहणी या संदर्भात ऑनलाइन नोंदीबाबत येणाऱ्या त्रुटींवर तातडीने उपाययोजना होणार नसेल तर किमान सहाय्यकस्तरावरील नोंदी या पूर्वीप्रमाणेच महसूल विभागाला थेट पाहणी करून सातबाऱ्यावर करण्याचे अधिकार द्यावेत. अन्यथा या शासकीय गोंधळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

- मोहन सावंत, पाली, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com