तळवडेत विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचे धडे

तळवडेत विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचे धडे

Published on

wt2113.jpg
99964
तळवडे ः इंग्लिश मीडियम शाळेत दिवाळी प्रदर्शन व विक्री उपक्रम राबविण्यात आला.

तळवडेत विद्यार्थ्यांना
आत्मनिर्भरतेचे धडे
इंग्लिश मीडियम प्रशालेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे आयोजित दिवाळी प्रदर्शन व विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित या प्रदर्शनात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत कंदील, पणत्या, फराळ अशा अनेक वस्तूंची विक्री करून एक वेगळा अनुभव घेतला. पालक व ग्रामस्थांनी वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी संस्थेचे खजिनदार सी. एल. नाईक, सदस्य सतीश बागवे, डॉ. नितीन सावंत, अमोल सावंत, छाया नाईक, प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
दीपावलीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शालेय किल्ले बांधणी स्पर्धेला देखील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग यांसारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारून दुर्गसंवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com