जनतेच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

जनतेच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Published on

swt2118.jpg
99989
सावंतवाडीः येथे पत्रकार परिषदेत उपस्थित रुपेश राऊळ, निशांत तोरसकर, चंद्रकांत राऊळ आदी.

जनतेच्या समस्यांकडे
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
रुपेश राऊळः सत्ताधाऱ्यांच्या वादात विकास बोंबलत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः जनतेच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालंय. लोकप्रतिनिधी इथल्या प्रश्नांवर बोलत नाहीत. प्रलंबित प्रश्न तसेच असून आमदार, खासदार जनतेस भेटणं मुश्कील झालंय, असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून हाणला. विकासाच भिजत घोंगड पडलं असून सत्ताधाऱ्यांच्या वादात विकास बोंबलत पडलाय. युवकांच्या रोजागारबाबात कोण बोलत नाही. जाती-पातीच्या राजकारणात युवकांना अडकवले जातेय, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
श्री. राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, शहर संघटक निशांत तोरसकर आदी उपस्थित होते. श्री. राऊळ म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधी जातीय तेढ निर्माण करून पक्षवाढीच्या प्रयत्नात आहेत. विकासकामांकडे त्यांचे दुर्लक्ष झालं असून पक्षाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत आहेत. परंतु, जनतेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला त्यांना वेळ नाही. तु मोठा की मी मोठा? या वादात विकास बोंबलत पडला आहे. युवकांच्या रोजागारबाबात कोण बोलत नाही. जाती-पातीच्या राजकारणात युवकांना अडकवलं जात आहे. एरवी यावर बोलणारे दीपक केसरकरही आज त्यावर बोलत नाही. पालकमंत्री जातीय तेढ निर्माण करत आहेत. स्वतःच पक्षातील स्थान निर्माण करताना जनतेच्या समस्यांकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी इथल्या जनतेच्या प्रश्नांनावर बोलत नाहीत. प्रलंबित प्रश्न तसेच राहीलेत. आमदार आणि खासदार यांना जनतेस भेटणं मुश्कील झालं आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com