चिपळूणची समृद्धी भारताची फ्रीडायविंग प्रशिक्षक

चिपळूणची समृद्धी भारताची फ्रीडायविंग प्रशिक्षक

Published on

- rat२१p२२.jpg -
२५O०००१५
फ्री-डायव्हिंग प्रशिक्षक समृद्धी देवळेकर
----
चिपळूणची समृद्धी भारताची ‘फ्रीडायविंग प्रशिक्षक’
पंखावरून उतरली पाण्यात ; एका श्वासात १२० फूट खोल समुद्रात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः चिपळूणची कन्या समृद्धी देवळेकर हिने महाराष्ट्रातील एकमेव फ्रीडायविंग प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळाला आहे. फ्रीडायविंग ही एक अनोखी जलक्रीडा आहे. ज्यामध्ये कोणत्याही ऑक्सिजन सिलिंडरचा वापर न करता, फक्त एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश केला जातो.
ही केवळ शारीरिक ताकदीची नाही, तर मानसिक स्थैर्य, आत्मनियंत्रण, आणि निसर्गाशी एकरूप होण्याची एक साधना आहे. समृद्धी सध्या एका श्वासावर तब्बल १२० फुटांहून अधिक खोल डाइव्ह करू शकते आणि ४ मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते. ही एक अतुलनीय आणि अत्यंत दुर्मिळ क्षमता आहे. समृद्धीचे आयुष्य सुरुवातीला आकाशाशी जोडलेले होते. ती एक ट्रेनी पायलट होती. पण पंखांमधून पाण्यात उतरलेली तिची ही जीवनकथा अद्वितीय आहे. तिचे प्राथमिक शिक्षण चिपळूणमध्ये झाले. उच्च शिक्षणासाठी ती पुणे येथे गेली. तेथे पायलटचे शिक्षण घेत असताना तिला सोशल मीडियावरून फ्रीडायविंग या खेळाची माहिती मिळाली. त्यानंतर या खेळाकडे ती आकर्षित झाली. दोन वर्षापूर्वी तिने या खेळाकडे लक्ष केंद्रित केले. अल्पकालावधीत ती या खेळात मान्यता मिळवणाऱ्यांपैकी भारतातील मोजक्या व्यक्तींमध्ये ती एक ठरली. समृद्धी आता प्रमाणित फ्रीडायविंग प्रशिक्षक बनली आहे.
भारतात या खेळाचे प्रशिक्षण देणारे चार प्रशिक्षक आहेत. त्यामध्ये एक समृद्धी आहे. हा खेळ खेळणारे भारतात केवळ ३० जण आहेत. तिने कुडाळ आणि मालदीवमध्ये शुभम पांडे यांच्याकडून या खेळाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आतंराष्ट्रीय स्तरावर नाव कमविण्यासाठी ती फिलिपिन्समध्ये गेली. तेथे आंतरराष्ट्रीय पातळीवर फ्रीडायविंग कोर्सेस व कार्यशाळा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील डायव्हर्स ऑफ विंगोरीय यांच्यासोबत प्रशिक्षण देण्यासाठी दाखल झाली आहे.
----
कोट १
भारतात फ्रीडायविंग अजून फारसा माहीत नाही, पण योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास आपण उत्कृष्ट फ्रीडायव्हर्स आणि प्रशिक्षकही घडवू शकतो. कारण भारतीयांमध्ये फ्रीडायविंगसाठी अपार क्षमता आहे. आपल्याकडे असलेली मानसिक शांतता, योगाभ्यासाची परंपरा, शारीरिक सहनशक्ती आणि आत्मनियंत्रण या सर्व गुणांमुळे आपण या खेळात जागतिक स्तरावर आघाडी घेऊ शकतो.
- समृद्धी देवळेकर, चिपळूण
----
कोट २
समृद्धीच्या या वाटचालीमुळे चिपळूणसारख्या लहानशा शहरातून आंतरराष्ट्रीय जलक्रीडा क्षेत्रात एक झळाळता तारा निर्माण झाला आहे. तिच्या यशाने तिच्या कुटुंबाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे.
- राजेश देवळेकर (वडील)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com