कोंडगाव, साखरपामध्ये बीएसएनएल सेवा ठप्प
‘लाचलुचपत’तर्फे
जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी ः येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयातर्फे २७ ते २ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या निर्मूलन जनजागृती कालावधीत रत्नागिरी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील ग्रामपंचायत, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना येथे भ्रष्टाचार निर्मूलन बैठका, शाळा व महाविद्यालयामध्ये व्याख्यान, चर्चासत्र, निबंध स्पर्धा, पथनाट्य, योगावर्ग, व्यायामशाळा व ज्येष्ठ नागरिक यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अविनाश पाटील यांनी केले आहे, तसेच कोणीही शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी लाच रकमेची मागणी करत असल्यास कार्यालयाचा ई-मेल आयडी acbratnagiri@gmail.com या संकेतस्थळावर अथवा टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच कार्यालयीन फोन नंबरवर संपर्क साधावा.
---------------
कोंडगाव, साखरपामध्ये
बीएसएनएल सेवा ठप्प
संगमेश्वर ः तालुक्यातील कोंडगाव व साखरपा परिसरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा गेले आठ दिवस ठप्प आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ऑनलाईन कामे खोळंबली. यामध्ये उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. चार किलोमीटरच्या परिसरात ही सेवा बंद असून, मुर्शीच्या पुढे व भोवडेच्या पुढे व दाभोळे या ठिकाणी ही सेवा चालू आहे; मात्र कोंडगाव बाजारपेठेत व साखरपा परिसरात इंटरनेट सेवा बंद असून, याकडे संबंधित खाते दुर्लक्ष करत आहे.
------
खेड जेसीआय
अध्यक्षपदी नामुष्टे
खेड : जेसीआयच्या अध्यक्षपदी अमित नामुष्टे, तर सचिवपदी मधूर पेठे यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष अमर दळवी यांनी त्यांच्या संपूर्ण वर्षाचा अहवाल मांडला व त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संकेत अपिष्टे यांनी काम पाहिले. पदग्रहण समारंभ डिसेंबरमध्ये होणार आहे. सभेला माजी अध्यक्ष शैलेश मेहता, गोविंद राठोड, रवी जाधव, आनंद कोळेकर, पराग पाटणे, प्रमोद कांबळे, जावेद कौचाली, गणेश राऊत, प्रियेश तलाठी, मिलिंद इवलेकर, अमोल क्षीरसागर, अमित कदम आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

