-कष्टाने उभं केलेलं पीक भिजलं

-कष्टाने उभं केलेलं पीक भिजलं

Published on

rat२४p१२.jpg-
२५O००१५१
चिपळूण : पिंपळी येथे परतीच्या पावसामुळे अशी भातशेती आडवी झाली आहे.
----
चिपळूणमध्ये पावसाने भातशेती संकटात
कष्टाने उभं केलेलं पीक भिजलं ; शेतकऱ्यांचे आर्थिक संकट तीव्र
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः ऐन दिवाळीत चिपळूणमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे भातकापणी करणाऱ्या शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी कापणी केलेला भात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पूर्ण खरीप हंगामात विविध संकटांना सामोरे जात येथील शेतकऱ्यांनी भातशेती पिकवली होती. मोठ्या कष्टाने पिकवलेले धान्य घरात आणण्याच्या शेवटच्या क्षणालाही पावसाने धांदल उडवल्याने शेतकरी चिंतातूर झाला. यापूर्वी शंभरहून अधिक शेतकऱ्यांचे सुमारे १६ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात आता नव्याने भर पडणार आहे. पावसाचा कोणताच अंदाज नसताना मंगळवारी दुपारपासून पावसाने रंग दाखवण्यास सुरुवात केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाने कापलेला भात सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यास संधीच दिली नाही. सध्या कापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी पीक घरात आणण्याच्या उद्देशाने भातकापणीला सुरुवात केली होती; मात्र वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

चौकट
कापलेल्या भाताचे नुकसान
या पावसाचा सर्वाधिक फटका कापणी करून शेतात ठेवलेल्या भाताला बसला आहे. पावसामुळे भाताचे भारे पूर्णपणे भिजून गेले आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे उभे पीकही आडवे होऊन पाण्यात भिजले आहे. भिजलेल्या भाताला आता कोंब फुटण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
---
कोट
तालुक्यात अलोरे, पोफळी, शिरगाव, सावर्डे, खडपोली, पिंपळी, मार्गताम्हाणे, असुर्डे, कामथे आदी भागात कमी-अधिक प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची आणि योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
--भीमराव खरात, शेतकरी, अलोरे
---------
कोट
दिवाळीच्या सुटीमध्ये असलेले अधिकारी परतल्यानंतर पंचनामे करण्याची कार्यवाही होईल, त्याचा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल. जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
--शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com