राजापूर-भाजीविक्रेत्या आजींना दिला मोबाईल भेट

राजापूर-भाजीविक्रेत्या आजींना दिला मोबाईल भेट

Published on

rat24p33.jpg-
00255
राजापूर ः भाजीविक्री करणाऱ्या टेमकर आजींशी संवाद साधताना राजन लाड.
-----------
भाजीविक्रेत्या आजींना दिला मोबाईल भेट
राजन लाड यांचा दिवाळीतील उपक्रम; नादुरुस्त झाल्याने संपर्कात अडथळे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः राजापूर आणि लांजा तालुक्यातील आठवडा बाजारामध्ये भाजीपाल्यासह मोड आलेले कडधान्य विकणाऱ्या तालुक्यातील गोवळ येथील वासंती टेमकर (टेमकर आजी) यांचा मोबाईल नादुरुस्त झाला होता. त्यामुळे त्यांचे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले होते. त्यांची समस्या ओळखून जैतापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजन लाड यांनी स्वखर्चाने त्यांना दिवाळीमध्ये स्मार्टफोन भेट दिला.
दोन दशकांहून अधिक काळ गोवळ येथील टेमकर आजी राजापूर आणि लांजा तालुक्यातील आठवडा बाजारात भाजी आणि कडधान्य विक्रीचा व्यवसाय करत आहेत. रोज सकाळी बास्केट भरून पिशव्या घेत, कधी एसटीने, कधी रिक्षाने, तर कधी टेम्पोने प्रवास करतात. राजापूर, नाटे, जैतापूर असे त्यांचे दर आठवड्याचे ठरलेल्या बाजारांसह लांजा तालुक्यातील आठवडा बाजारामध्ये भाजीची विक्री करतात. या सर्व धावपळीत त्यांचा मोबाईल काही महिन्यांपूर्वी बंद पडला होता. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना त्यांना अडथळे येत होते. जैतापूर येथील मोबाईल व्यावसायिक विक्रांत नारकर यांच्या सहकार्याने आजींचे जुने सीम कार्ड नवीन नेटवर्कमध्ये पोर्ट करून त्यांना राजन लाड यांनी नवीन स्मार्टफोन भेट दिला. तसेच बाजार संपल्यानंतर आजींना त्यांच्या गोवळ येथील घरी गाडीतून पोहोचवण्याची व्यवस्थाही स्वतः केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com