पावसामुळे भातपीक झाले आडवे

पावसामुळे भातपीक झाले आडवे

Published on

00440

पावसामुळे भातपीक झाले आडवे

शेतकरी चिंतेत; बांदा परिसरात लाखो रुपयांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः बांदा व परिसरातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे मोठे संकट कोसळले आहे. अनेक ठिकाणी उभे पीक आडवे पडून जमिनीवरच कुजण्याच्या अवस्थेत आले आहे, तर काही ठिकाणी कोंब फुटल्याने धान्य निरुपयोगी ठरत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पाडलोस, न्हावेली, मडुरा, कास, निगुडे, सोनुर्ली, सातोसे, शेर्ले, दांडेली, बांदा, वाफोली, विलवडे आणि इन्सुली या गावांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. खत, बियाणे, मजुरी यांवर हजारो रुपये खर्च करून उभे केलेले पीक अवकाळी पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून ठेवलेले पीक पावसाने भिजून कुजत असून, ते विकण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील आशेचा किरण आता अवकाळी पावसात बुडाल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.
..............
रब्बी हंगामही आला धोक्यात
शासनाने नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करावेत आणि योग्य ती नुकसानभरपाई द्यावी. पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवल उभारणेही अशक्य झाल्याचे पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सांगितले.
..................
कोट
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून अजूनही पाहणी झाली नाही. अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते सुटीवर असल्याचे सांगतात. मात्र, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता शासनाने तत्काळ कार्यवाही करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी आणि झालेल्या नुकसानीचा योग्य अहवाल सादर करावा. जर तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर शेतकऱ्यांना शासनाविरोधात आवाज उठवावा लागेल.
- नंदा गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाडलोस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com