विरेश्वर तलावातील मासे गतप्राण

विरेश्वर तलावातील मासे गतप्राण

Published on

विरेश्वर तलावात मासे गतप्राण
चिपळूण ः शहरातील विरेश्वर तलाव येथील मासे मोठ्या प्रमाणावर गतप्राण झालेले आहेत. अज्ञाताने तलावात केमिकल टाकले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. काही वर्षापूर्वी तलावातील मासे मेले होते. पालिकेने तलावातील मेलेले मासे बाहेर काढून तलाव स्वच्छ केले होते. आज पुन्हा तलावात मेलेले मासे आढळून आले. या घटनेची पालिकेने दखल घ्यावी, अशी मागणी भाजपचे चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केली आहे. याबाबत भाजप कार्यकर्ते महेश दीक्षित यांनी प्रत्येक वर्षी अशी घटना घडते. त्यामुळे विरेश्वर तलाव येथे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे.

‘गांधारेश्वर-रेल्वेस्टेशन’
मार्गावरील झाडी धोकादायक
चिपळूण ः गांधारेश्वर मंदिराकडून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडेझुडपे वाढली आहेत. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पालिकेने येथील झाडीझुडपांची स्वच्छता करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते उमर मुकादम यांनी पालिकेकडे केली आहे. कोकण रेल्वेचे चिपळूण स्थानक वालोपे येथे आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी जाणारे प्रवासी याच मार्गाने जात असतात. काही पेठमाप, साईनाका मार्गाने प्रवास करतात; मात्र या रस्त्यावर मोठी झाडेझुडपे वाढल्यामुळे प्रवास करणे अडचणीचे वाटू लागले आहे. या मार्गावर रात्री विजेची सोय नाही. त्यामुळे अंधारातून प्रवास करताना नागरिकांना भीती वाटते. त्याची पालिकेने दखल घ्यावी, अशी मुकादम यांची मागणी आहे.

‘गव्याचा हल्ला झालेल्यांच्या
कुटुंबाना मदत मिळून देणार’
चिपळूण ः गव्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या गुढे जोगळेवाडी (ता. चिपळूण) येथील रवींद्र पांडुरंग आग्रे यांच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून २५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची माहिती चिपळूण शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख विक्रांत चव्हाण यांनी दिली. रवींद्र आग्रे हे मार्गताम्हाणे येथील दवाखान्यात जात असताना गुढे मोरेवाडी स्मशानभूमीजवळ अचानक समोर आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांच्या दुचाकीचा चुराडा झाला. शिवाय गव्याचे शिंग छातीत खुपसल्याने ते गंभीर जखमी होऊन यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.


तांबी नदीवरील पुलावर खड्डेच खड्डे
चिपळूण ः चिपळूण-गुहागर रस्त्यावर तांबी नदीचा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. तांबी पुलाजवळ एक फूट खोल खड्डा, अन्य खड्डे रस्त्यावर पडले आहेत. येथे सतत अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करून सुद्धा येथील खड्डे बुजवण्यात आले नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अरविंद सुर्वे यांनी स्वखर्चाने येथील खड्डे बुजवले. काही दिवसांपूर्वी पाटपन्हाळे येथील अजित कदम व पुरुषोत्तम कदम यांची दुचाकी खड्ड्यातून उडाली. राजेश बेंडलच्या चारचाकी गाडीवर फेकली गेली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार अजित कदम हे जखमी होऊन बेशुद्ध पडले होते. त्यांच्यावर कऱ्हाड येथे उपचार सरू आहेत. येथे सतत होणाऱ्या अपघाताची दखल घेऊन रावळगावचे माजी उपसरपंच संदीप सुर्वे यांनी खड्डे बुजवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com