छत्रपतीनगर येथे ३० फूट लांब ‘विजयदुर्ग’ साकारला
rat26p3.jpg-
00517
रत्नागिरी : छत्रपती नगर येथे साकारलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती.
छत्रपतीनगर येथे साकारला ‘विजयदुर्ग’
श्री शिवशंभु मित्र मंडळ; मराठा आरमाराची शान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : साळवी स्टॉप- छत्रपती नगर येथील श्री शिवशंभु मित्र मंडळाने मराठा आरमाराची शान असलेल्या श्री विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. तब्बल १५ दिवस रात्रंदिवस मेहनत घेऊन साकारलेला हा ३० फूट लांब, १५ फूट रुंद आणि ४ फूट उंच जलदुर्ग सध्या परिसरातील चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे.
या किल्ल्याचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चव्हाण, सौरभ मलुष्टे, योगेश विरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मंडळातर्फे दरवर्षी किल्ला साकारला जातो. या जलदुर्गाच्या चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला देखावा तयार करण्यात आला आहे. मंडळातील शौर्य मांजरेकर, अथर्व शिंदे, आर्यन चव्हाण, रुचिग मूडे, सुधीर मावडि, आदेश शेलार, तनिष रेडीज, अनिल बावडेकर, सिद्धू भोरे, श्रीयोग चव्हाण, अखिलेश बांबाडे, वैभव पांचाळ, अजय रेडीज, गौरव सावंत, निखिल सावंत, प्रसाद सावंत, अभिजीत गिरकर, अथर्व वरे, नेहा सावंत, ऋषी दुधाने, अंशिका शिंदे, शिवांगी चव्हाण, आकांक्षा चव्हाण, वेदिका चव्हाण, राजस वने, अद्वैत रासकर, यश सुर्वे, श्रेयस झगडे, शुभम मावडी, ऋत्विज पेडणेकर, वेदांत सावंत आणि इतर सदस्यांनी एकत्र येत हा ऐतिहासिक ठेवा उभा केला आहे. छत्रपती नगर येथे हा किल्ला त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुला राहणार आहे. या ऐतिहासिक प्रतिकृतीला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

