विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनवण्याचे स्वप्न
विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनवण्याचे स्वप्न
प्रा. प्रभात कोकजे ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विचार
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः विद्यार्थ्यांचे वय, रूची या मुख्य गोष्टी विचारात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमाचा आराखडा बनवण्यात आला आहे. विद्यार्थी घडवताना त्याला आवडत्या क्षेत्रातील शिक्षण सहजतेने घेण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन सुजाण नागरिक बनवणे आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करणे, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टदेखील आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे शिक्षणव्यवस्थेला खऱ्या अर्थाने आकार देणारे ठरेल, असा विश्वास प्राध्यापक प्रभात कोकजे यांनी व्यक्त केला.
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणात सावर्डे येथे ते बोलत होते. जूनमध्ये रत्नागिरी येथील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणादरम्यान एका खासगी बसचा निवळी येथे मोठा अपघात झाला होता. प्रशिक्षणार्थ्यांच्या या बसला अपघात झाल्याने या शिक्षकांना संबंधित प्रशिक्षणातून बाहेर पडावे लागले होते. या अपघाताची दखल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तत्काळ घेत या विषयाची माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना दिली होती. भुसे यांनी त्याचवेळी संबंधित शिक्षकांचे प्रशिक्षण पुन्हा घेण्यात येईल, त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यालाच अनुसरून त्या शिक्षकांचे प्रशिक्षण चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या प्रशालेत डाएटतर्फे सुरू झाले आहे. या वेळी २५ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
कोट
प्रत्येक शिक्षकाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करताना त्याचा आराखडा समजून घेण्याची गरज असल्याचे नमूद केले. आज विद्यार्थ्यांना अनावश्यक विषयदेखील घ्यावे लागतात व त्यात रूची नसताना देखील त्याच्या परीक्षा देत पुढे सरकावे लागते; पण नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊनच विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र कायम ठेवण्यात आले असून, तंत्रज्ञानाधारित शिक्षण व अनुभवाधारित शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. पारखद्वारे एकसामान मूल्यमापन व्यवस्थाही करण्यात आली आहे.
- प्रा. प्रभात कोकजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

