शासन योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवा
00552
शासन योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवा
अनिल शिंगाडे ः तळेरे विद्यालयात दिव्यांग मेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २६ : ‘‘आपल्या दिव्यांग बांधवांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी सदैव दिव्यांगांच्या पाठीशी आहोत,’’ असे प्रतिपादन सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले. ते तळेरे येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते.
येथील वामनराव महाडिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर जिल्हा समन्वयक दीपक कापसे, सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, तळेरे विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, स्थानिक शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर, नीलेश सोरप, सुनील तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, सचिव मिनेश तळेकर, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताह्मणकर, तळेरे उपसरपंच संदीप घाडी, पोलिसपाटील चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, ग्रामपंचायत तळेरे आणि सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे तळेरे, कासार्डे, ओझरम, दारुम व साळिस्ते पंचक्रोशीसाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
कापसे यांनी दिव्यांगांच्या विविध मागण्यांविषयी मार्गदर्शन केले. दिव्यांगांना मिळणारी पेन्शन वाढवली असून ती मिळत नसल्यास अपंग प्रमाणपत्र आणि ‘यूडीआयडी’ची झेरॉक्स तहसील कार्यालयात जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले. विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. मोफत साहित्य वाटप केले. बालकृष्ण पांचाळ, दशरथ नकाशे, चंद्रकांत घाडी यांना श्रवणयंत्र, दिलीप कल्याणकर यांना पांढरी काठी दिली. अविनाश मांजरेकर, दीपक कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सुनील तांबे, विशाखा कासले, प्रसन्ना दळवी आदी उपस्थित होते. विशाखा कासले यांनी अहवाल वाचन केले. मिनेश तळेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

