सावंतवाडीतील शिंदे शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
00558
सावंतवाडीतील शिंदे शिवसेना
कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
सावंतवाडी ः लाखेवस्ती येथील युवा कार्यकर्ते परशुराम चलवाडी, नीलिमा चलवाडी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आपण शिंदे शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, दिलीप भालेकर, प्रसाद अरविंदेकर, केतन आजगावकर, अमेय पै आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---
00554
बांद्यातील ठाकरे गट शिंदे शिवसेनेत
बांदा ः शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचे दिवाळीनंतरही पक्षप्रवेशांचे धमाक्यांवर धमाके सुरूच आहेत. बांदा येथे शनिवारी (ता. २५) सायंकाळी ठाकरे शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख रियाज खान यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह ठाकरे शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख परब यांनी त्यांचे शिंदेसेनेत स्वागत केले. पक्ष प्रवेश केलेल्या प्रत्येकाचा योग्य आदर आणि सन्मान केला जाईल, असे अभिवचन दिले. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, तालुका संघटक गुरुनाथ सावंत, बांदा शहर प्रमुख ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते.
..................
00555
सांगेलीत पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
आरोंदा ः परतीच्या पावसाने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसाचा फटका सांगेलीतील शेतकऱ्यांना बसला आहे. कापण्यायोग्य झालेले भात पीक पावसाने आडवे केल्याने शेतकरी द्विधावस्थेत आहेत. सध्या पिकाला कोंब येण्याचे प्रकार वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. पावसामुळे डोळ्यादेखत शेतीचे नुकसान होत आहे. पेरणीवेळी काही शेतकऱ्यांना पावसामुळे दुबार पेरणी करावी लागली होती. त्यात त्यांचे आर्थिक नुकसान होऊनही त्यांनी परत पेरणी केली होती. त्यानंतर शेतीही चांगली झाली होती. मात्र, पीक कापण्यायोग्य झाले असतानाच आता परतीच्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे काही ठिकाणी कापलेले पीक भिजून कुजत आहे, तर काही ठिकाणी पिकांना कोंब येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
---
मळेवाड नदीपात्रात पुन्हा मगरीचे दर्शन
आरोंदा ः मळेवाड जकात नाका येथील पुलानजीक पुन्हा एकदा ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे येथील ग्रामस्थ व शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. काही दिवसांपूर्वी येथील पुलानजीक स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेस ही मगर पडली होती. या पुलाच्या परिसरात शेतकऱ्यांची शेती असून, सतत या ठिकाणी त्यांची ये-जा असते. शेतकऱ्यांची गुरे सुद्धा या नदीपात्रात जात असतात. अशावेळी या मगरीमुळे दुर्घटना घडू शकते. त्यामुळे वनविभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकरी, ग्रामस्थ करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

