‘नागपंचमी’ कीर्तनातून
मालवणमध्ये प्रबोधन

‘नागपंचमी’ कीर्तनातून मालवणमध्ये प्रबोधन

Published on

00590

‘नागपंचमी’ कीर्तनातून
मालवणमध्ये प्रबोधन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : चातुर्मास कीर्तनमालेचे आठवे पुष्प १५ अक्षय परुळेकर यांनी ‘गरुड महात्म्य आणि नागपंचमी’ विषयावर कीर्तन करून गुंफले. त्यांच्या किर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पूर्वरंगात श्री शांती ब्रह्ममहाराज एकनाथ यांनी लिहिलेला अभंग ‘ज्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर तोची साधू जगी सिद्धी’ हा घेतला. निरूपण म्हणजे एकाचा निरोप दुसऱ्याला देणे असे सांगून त्यांनी काम, क्रोध, लोभ मोह, मद, मत्सर या छटसती आहेत. देव, पितृ अतिथी यांची पूजा केली तर त्याला काहीच करायची गरज नाही. क्षमा आणि क्रोध यात श्रेष्ठ काय तर दोन्ही बाजू लक्षात घेऊन ज्याचा वापर करतो तो श्रेष्ठ आहे, अशी उदाहरणे देऊन निरूपण केले.
उत्तरंगात गरुडजन्म, सर्पसत्र व नागपंचमीचे रहस्य या विषयावर कीर्तन करताना परुळेकर यांनी कश्यपमुनी यांच्या दोन पत्नी, अदिती आणि विनिता यांची कथा सांगितली. कश्यप ऋषींच्या सांगण्यावरून कुद्रुला १०० मुले तर विनिताला २ मुले कशी झाली, पहिल्या मुलाच्या शापामुळे विनिता सवतीची दासी कशी होते, तिचाच दुसरा मुलगा गरुड आपली आई शापमुक्त होण्यासाठी कसे प्रयत्न करतो, ते सांगितले. परुळेकर यांनी कीर्तन करताना स्वरचित अभंग आपल्या मधुर आवाजात सादर केले. त्यामुळे श्रोते मंडळी मंत्रमुग्ध झाले. कीर्तनाला वाद्याची साथ सुधीर गोसावी व महेश तळवडेकर यांनी दिली. चातुर्मासचे शेवटचे पुष्प १ नोव्हेंबरला घननील उर्फ अमोल महाजन (मुंबई) हे ‘गुरुपादुकाष्टक’ या विषयावर प्रवचन करून गुंफणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com