‘थोडं कळत थोडं नकळत’ पुस्तकाचे प्रकाशन

‘थोडं कळत थोडं नकळत’ पुस्तकाचे प्रकाशन

Published on

rat२७p९.jpg-
२५O००७४७
रत्नागिरी : कवी विजयानंद जोशी लिखित ‘थोडं कळत थोडं नकळत’ पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रमोद कोनकर, जोशी, जनसेवाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, विनय परांजपे, अमोल पालये.

‘थोडं कळत थोडं नकळत’चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : येथील कवी, गझलकार विजयानंद जोशी यांच्या ‘थोडं कळत थोडं नकळत’ या दुसऱ्‍या काव्य-गझल संग्रहाचे प्रकाशन जनसेवा ग्रंथालयातर्फे रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात प्रकाशक प्रमोद कोनकर यांच्या हस्ते झाले.
कोकणातील समस्या, कोकणातील विषयांवर इथल्या लोकांनी सकसपणे लिहिले पाहिजे. इथल्या समस्या कोकणातील लोकांनी मांडल्या पाहिजे; मात्र तसे न होता कोकणावर मुंबई-पुण्यातील लोकं लिहितात, बोलतात. यामुळे इथल्या लेखकांनी अधिक सकस, दर्जेदार लेखन करायला हवं, असे मत या वेळी ज्येष्ठ प्रकाशक प्रमोद कोनकर यांनी व्यक्त केले. या वेळी विनय परांजपे यांनी काव्य-गझलसंग्रहाचा सुरेख रसास्वाद केला. जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आपण कविता करता करता गझल प्रवासाकडे कसे वळलो, याचा प्रवास कवी विजयानंद जोशी यांनी मनोगतात मांडला. सूत्रसंचालन अमोल पालये यांनी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com