लक्ष्मीकांताच्या कार्तिकोत्सवाला १५६ वर्षांची परंपरा
-rat२७p६.jpg-
२५O००७४४
रत्नागिरी : केळ्ये गावातील श्री देव लक्ष्मीकांत.
-rat२७p७.jpg-
P२५O००७४५
रत्नागिरी : देव लक्ष्मीकांत मंदिरात काकडा आरती करताना भाविक.
----
श्री लक्ष्मीकांत मंदिरातील १५६ वर्षांचा कार्तिकोत्सव
केळ्ये गावात एकादशी मंडळाचे नियोजन ; महिनाभर पहाटे काकडा आरती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : तालुक्यातील केळ्ये गावातील श्री देव लक्ष्मीकांत मंदिरात कार्तिकोत्सवानिमित्त काकडा आरती गेली १५६ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. आजही या उत्सवाचे स्वरूप म्हणजे महिनाभर दररोज पहाटे ४.४५ ते सकाळी ६ पर्यंत काकडा आरती मनोभावे करण्यात येते. या आरतीला दररोज सरासरी २५ ते ३५ जण उपस्थित असतात. हा उत्सव एक महिन्याचा असल्याने तो साजरा करणे म्हणजे शिवधनुष्य; परंतु एकादशी मंडळाने या उत्सवाचे सुयोग्य नियोजन केले आहे.
रत्नागिरी शहरापासून ११ किलोमीटवर केळ्ये गाव आहे. गावात श्री लक्ष्मीकांत, श्री विश्वेश्वर, श्री गणपती पंचायतन, श्री राधाकृष्ण व ग्रामदेवता अशी पुरातन मंदिरे आहेत. श्री लक्ष्मीकांत देवळाची स्थापना नेने यांनी सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वी केली. त्यांना श्रीविष्णू, श्री लक्ष्मीकांत या देवाची मूर्ती सागरात जाळ्यात सापडली, ती त्यांनी घरी आणली ते ठिकाण म्हणजे नेनेवठार, येथे असलेले त्यांचे घर. नंतर त्यांनी देवाची प्रतिष्ठापना करून घुमटी बांधली. ग्रामस्थांनी त्याची वेळोवेळी सुधारणा केली, जीर्णोद्धार केला.
श्री लक्ष्मीकांत मंदिरात कार्तिकोत्सव, गोकुळाष्टमी, नामसप्ताह असे उत्सव करण्यात येतात. हे देऊळ सार्वजनिक आहे; परंतु याची देखभाल, दुरूस्ती, पूजाअर्चा एकादशी मंडळाकडून करण्यात येते. लिखित माहितीनुसार, १९६९ ला मंदिराचा शताब्दी उत्सव साजरा केला त्या वेळचे एकादशी मंडळाचे अध्यक्ष जनार्दन धोंडदेव गोखले (वय ७०) व अन्य ज्येष्ठ मंडळी यांनी कालगणनेबाबत चर्चा केली. अध्यक्षांचे वडील धोंडदेव गोखले हे त्यांच्या वडिलांपासून हा उत्सव चालू आहे, असे सांगत. त्यामुळे १९६९ ला या उत्सवाला १०० वर्षे पूर्ण झाली, असे समजून शताब्दी वर्ष साजरे करण्यात आली. त्यानंतर १९९४ मध्ये १२५ वर्षे, २०१९ मध्ये १५० वर्षांचा उत्सव साजरा करण्यात आला. आता १५६वे वर्ष सुरू आहे. एकादशी मंडळाची स्थापना केव्हा झाली, याची लिखित माहिती नाही; पण पूर्वीच्या काळात सर्व शेतकरी शेतीची कामे बंद ठेवत व एकादशीला देवळात जमून बैठक घेत. आता दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी बैठक घेऊन निर्णय घेतले जातात.
--------
चौकट १
१८७४ची सनद
देवळासमोर असलेल्या घराघरांत असलेली घंटा ही शके १७११ मध्ये कासाराने ओतली होती, असा उल्लेख त्या ११७ किलो वजनाच्या घंटेवर होता तसेच त्या घंटेचासुद्धा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या देवळास ११ रुपयांची १८७४ची सनदसुद्धा होती. या देवळाचा सद्यःस्थितीतील जीर्णोद्धार एकादशी मंडळाकडून २००६ मध्ये करण्यात आला.
---
कोट
कार्तिकोत्सव आश्विन वद्य १ ते कार्तिक वद्य १ या एक महिन्यात साजरा होतो. दररोज पहाटे ४.४५ ते सकाळी ६ पर्यंत काकडा आरती, त्रिपुरी पौर्णिमेला श्री लक्ष्मीकांताची पूजा बांधण्यात येते. श्री लक्ष्मीकांत व श्री हनुमानावर अभिषेक करण्यात येतो. तुलसीविवाह, सायंकाळी त्रिपूर उजळले जातात नंतर आरत्या, भोवत्या, मंत्रपुष्प, कीर्तन कार्यक्रम होतात. कार्तिक वद्य १ रोजी पहाटे लळिताची काकडा आरती नंतर सांगता सभा आणि दुपारी महाप्रसाद असतो.
- सुनील सहस्रबुद्धे, केळ्ये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

