सांगेली उपसरपंच शिंदे शिवसेनेत

सांगेली उपसरपंच शिंदे शिवसेनेत

Published on

00767
सांगेली ः येथील उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत संजू परब यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

सांगेली उपसरपंच शिंदे शिवसेनेत
सावंतवाडी ः तालुक्यातील सांगेली गावचे भाजपचे विद्यमान उपसरपंच संतोष नार्वेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नार्वेकर हे सांगेलीतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी होते. त्यांच्या या पक्षबदलामुळे सांगेली परिसरात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली असून हा भाजपसाठी एक धक्का मानला जात आहे. यावेळी श्री. नार्वेकर यांनी, श्री. परब यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून आम्ही सर्वजण शिवसेनेत प्रवेश करत आहोत, असे स्पष्ट केले. श्री. परब यांनी श्री. नार्वेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, युवा तालुकाप्रमुख क्लॅटस फर्नांडीस, आशिष झाटये, सचिव परीक्षित मांजरेकर, सचिन साटेलकर, जीवन लाड, पंढरीनाथ राऊळ, अंकुश परब, अभय किनळोस्कर, दीपक सांगेलकर, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.
-----------------
00768
सावंतवाडी ः तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांनी आपल्या समर्थकांसह संजू परबांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

तळवणे उपसरपंचांचा भाजपला रामराम
सावंतवाडी ः सांगेली पाठोपाठ शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी तळवणे गावात भाजपला धक्का दिला. तळवणे उपसरपंच रामचंद्र गावडे यांनी आपल्या समर्थकांसह कमळाची साथ सोडत धनुष्य हाती घेतला. आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश घेण्यात आला. श्री. परब यांनी तालुक्यात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु केला आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे पक्षप्रवेश पाहायला मिळत असून तालुक्यातील सांगेली पाठोपाठ आता तळवणे येथील उपसरपंच गावडे यांच्यासह माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा प्रक्ष प्रवेश आज त्यांनी घेतला. भाजपाला हा दुसरा धक्का असून विद्यमान उपसरपंच रामचंद्र (रंजन) गावडे, यांच्यासह माजी उपसरपंच निलेश गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रविण बर्वे आदींसह शेकडोंनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, सुधा कवठणकर, सुरेंद्र बांदेकर, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, अनुसुचित जाती सेल युवा प्रमुख प्रशांत जाधव, विनोद सावंत, गजानन नाटेकर, अर्चित पोकळे, महादेव राऊळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com