दिवाळीचा एक दिवा शिवरायांच्या चरणी...

दिवाळीचा एक दिवा शिवरायांच्या चरणी...

Published on

00842

दिवाळीचा एक दिवा शिवरायांच्या चरणी...

खारेपाटण किल्ल्यावर दीपोत्सव; गगनभेदी शिवगर्जनेने परिसर दुमदुमला

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २७ : ‘दिवाळीचा एक दिवा माझ्या राजाचरणी’ या उपक्रमांतर्गत किल्ले संवर्धन समिती, खारेपाटण आणि ‘मावळे आम्ही स्वराज्याचे’ तसेच ग्रामपंचायत खारेपाटण आणि श्री कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्टतर्फे किल्ले खारेपाटण येथे शनिवारी (ता. २५) रात्री दीपोत्सव व मशाल उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
दीपोत्सवामध्ये खारेपाटणमधील सर्व स्थानिक सामाजिक मंडळे, संस्था, महिला व शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. श्री केदारेश्वर मंदिर येथून बस स्थानकमार्गे खारेपाटण बाजारपेठ ते थेट खारेपाटण किल्ला अशी भव्य मशाल मिरवणूक काढण्यात आली.
सायंकाळी पाऊस पडल्याने थोडा हिरमोड झाला, तरी मावळे मशाल फेरी काढण्यावर ठाम होते. विशेष म्हणजे गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने किल्ल्यावर जमा झाल्या होत्या. पाऊस थांबल्यावर मशाल फेरीला सुरुवात झाली. केदारेश्वर मंदिर, बस स्थानक, बाजारपेठ, केंद्रशाळा खारेपाटणमार्गे मशाल फेरी किल्ल्यावर पोहोचली. तिथे संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीला सुमारे १०१ मशाली पेटवून मशालोत्सव साजरा केला. त्यामुळे किल्ला परिसर तेजाने उजळून निघाला.
बालेकिल्ला बुरुजावरून फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा गगनभेदी गर्जना देऊन खारेपाटण किल्ला परिसर दणाणून सोडला. वर्षभर किल्ले खारेपाटण येथे गडाची तटबंदी स्वच्छता मोहिमेसाठी राबवलेल्या दुर्गसेवकांचा सत्कार केला. खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, किल्ले संवर्धन समितीचे मंगेश गुरव, ऋषिकेश जाधव, संकेत शेट्ये, तेजस झगडे, देवानंद ईसवलकर, ‘मावळे आम्ही स्वराज्याचे’ संघटनेचे वैभववाडी शाखेचे अक्षय तेली, दिनेश माने, अनिकेत तर्फे, प्रथम चव्हाण, युवराज खांडेकर, श्री देव कालभैरव मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी बबन तेली, महिला कार्यकर्त्या साधना धुमाळे, कीर्ती शेट्ये, प्राप्ती कट्टी, संतोष पाटील, शेखर कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com