पुढची एकादशी नवीन विठ्ठल मंदिरात

पुढची एकादशी नवीन विठ्ठल मंदिरात

Published on

ra२७p२०.jpg-
२५O००७८९
रत्नागिरी ः येथील विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणाच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत अन्य मान्यवर.

सुशोभित विठ्ठल मंदिरात पुढची एकादशी
मंत्री उदय सामंत ः उपऱ्यांच्या सल्ल्याची मला गरज नाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : भाजप-शिवसेना महायुतीमध्ये किती समन्वय आहे, हे आज स्पष्ट झाले. आजच्या कार्यक्रमाचे सर्व नारळ भाजपच्या पदाधिकाऱ्‍यांनी फोडले. आज ३०० वर्षांपूर्वीच्या विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरण आणि आवारातील मंदिरांचे नूतनीकरण हे काम माझ्या हस्ते झाले म्हणजे माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. तुम्हाला शब्द देतो पुढची एकादशी सुशोभित विठ्ठल मंदिरात होईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी सामंत म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर बोलणाऱ्या काही उपऱ्यांचा सल्ला घेण्याची मला गरज नाही. रत्नागिरीची अस्मिता म्हणून विठ्ठल मंदिर, भैरी देवस्थान, काशीविश्वेश्वर ही मंदिरे आहेत. त्यांचे सुशोभीकरण करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटीचा निधी दिला आहे. या मंदिरात बारमाही धार्मिक कार्यक्रम होत असल्याने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
माझ्या पाठीमागे ठाम उभ्या राहणाऱ्या जनतेसाठी जिल्हा नियोजनाच्या निधीची किल्ली तुमच्याकडे आहे. तुम्ही सांगल ते विकासकाम केले जाईल. रत्नागिरीत आज मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. काहींना निवडणुकीच्या तोंडावर पोटशूळ उठला आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, मुन्ना सुर्वे, माजी नगराध्यक्ष प्रमोद रेडीज, बिपिन बंदरकर, बंड्या साळवी, विजय पेडणेकर, आनंद मराठे आणि राहुल पंडित आदी उपस्थित होते.
---
चौकट
अटलजींचे स्मारक उभारणार
काहींनी राजकारण करून अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळे महायुतीचे संबंध ताणले जातील, अशी खेळी केली; परंतु मी तुम्हाला शब्द देतो, महिना-दोन महिन्यात रत्नागिरीत अटलबिहारी वाजपेयी यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. यामुळे काहींचा बार फुसका ठरला आहे, असे सामंत म्हणाले.


चौकट
दोन महिन्यात सर्व रस्ते
गेली ६ महिने सतत पाऊस सुरू आहे. आजदेखील पाऊस झाला. त्यामुळे रस्त्याची कामे खोळंबली आहेत. नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, हे मला दिसतंय. पावसाने उघडीप दिली असती तर लगेच शहरातील सर्व रस्ते चकाचक झाले असते. मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, पुढच्या दोन महिन्यात रत्नागिरीतील एकाही रस्त्याला खड्डा दिसणार नाही असे सामंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com