संगमेश्वर ः सोनवी नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी
rat28p2.jpg
00921
संगमेश्वर ः नदीपात्रात साचलेला गाळ.
सोनवी, शास्त्री नदीतील गाळ उपसा करा
संगमेश्वरवासियांची मागणी; पुराचा धोका टळेल
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ ः संगमेश्वर बाजारपेठेला दरवर्षी पुराचा मोठा फटका बसत असून, याचे मुख्य कारण म्हणजे सोनवी आणि शास्त्रीनदीतील साचलेला गाळ आहे. या दोन्ही नद्यांमधील गाळ तातडीने उपसा करण्यात यावा, अशी मागणी संगमेश्वरमधील स्थानिकांकडून केली जात आहे.
सोनवी नदीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे नदीचा प्रवाह मंदावला असून, पूर्वी सुरू असलेला होडी प्रवासही बंद झाला आहे. संगमेश्वरजवळील निढळेवाडी परिसरातील होडी बांधणी व्यवसायालाही याचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी पावसाळ्यात नदीपात्रातील गाळ आणि झाडाझुडपांमुळे नदीला वाहण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, संगमेश्वर बाजारपेठेसह कसबा, माखजन, फुणगूस या बाजारपेठांना पुराचे पाणी शिरते आणि मोठे आर्थिक नुकसान होते.
याबाबत स्थानिक शेतकऱ्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. नदीकिनारी असलेल्या भातशेतीवर याचा प्रतिकूल परिणाम होत असून, शेतीचे नुकसान होत आहे. चौपदरीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननामुळे नदीपात्रात भराव साचल्यामुळे पाणी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात येत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. सोनवी आणि शास्त्रीनदीतील गाळ उपसा तातडीने करून नदीचा प्रवाह सुरळीत करावा जेणेकरून पुराचा धोका आणि बाजारपेठेचे नुकसान टाळता येईल, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

