मंडणगड : शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ करा

मंडणगड : शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ करा

Published on

Rat29p4.jpg-
01150
मंडणगड : तहसील कार्यालयात निवेदन देताना बळीराज सेनेचे कार्यकर्ते.

शेतकऱ्यांचे शेतीकर्ज माफ करा
संघटनांची मागणी; पावसामुळे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २९ ः ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मंडणगड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देऊन शेती कर्जमाफ करावे, अशी मागणी विविध संघटनांनी आज निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मंडणगड तहसील कार्यालयात देण्यात आले.
मंडणगड तालुका बळीराजा सेनेच्यावतीने तालुकाध्यक्ष ज्ञानदेव खांबे यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तसेच जंगली श्वापदांमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी तसेच सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी करणारे निवेदन निवासी नायब तहसीलदार संजय गुरव यांना देण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष सखाराम माळी, शंकर कदम, विभागप्रमुख मधुकर मालप तसेच अजित मोरे, समीर पारधी, संजय शिगवण, सुनील माळी, प्रवीण माळी, रामदास भागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. संघर्ष समिती मंडणगड यांच्यावतीने अध्यक्ष अरविंद येलवे यांच्या नेतृत्वाखाली याच विषयावर निवेदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. या प्रसंगी उपाध्यक्ष सिंकदर बुरूड, सचिव भरत सरपरे तसेच विश्वास सुगदरे, संकते तांबे, सतिष जाधव, अभय पिचुर्ले, सचिन धोत्रे, मयुरेश धोत्रे आणि अॅड. विराज गमरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com