''रवळनाथ''तर्फे कर्मचाऱ्यांना २७ लाख बोनस वितरित
swt304.jpg 
1355
एम. एल. चौगुले
‘रवळनाथ’तर्फे कर्मचाऱ्यांना
२७ लाख बोनस वितरित 
एम. एल. चौगुलेः प्रगतीचा चढता आलेख कायम
सकाळ वृत्तसेवा 
कुडाळ, ता. ३०ः श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना एकूण २७ लाख ११ हजार ६७४ रुपये बोनस वितरीत केला आहे, अशी माहिती ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.
श्री. चौगुले म्हणाले, ‘‘सभासदांचा विश्वास, कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि परिश्रम यामुळे संस्थेने प्रगतीचा चढता आलेख कायम राखला आहे. संस्थेच्या व्यावसायिक प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. संस्थेच्या प्रधान कार्यालयासह १६ शाखांकडे मिळून सध्या १५९ कर्मचारी कार्यरत आहेत. एप्रिल २०१४ पासून कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगानुसार वेतन तसेच प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, पेन्शन, मेडिक्लेम, पगारी रजा, बोनस आदी लाभ दिले जातात. संस्थेच्या वृद्धीसाठी वेळोवेळी कर्मचारी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतात. दिल्लीसह अन्यत्र होणाऱ्या प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांना पाठविले जाते. प्रशिक्षित कुशल कर्मचारी वर्ग हे रवळनाथचे वैशिष्ट्य आहे. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोबाईल बॅंकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, लॉकर, डिजिटल सेवा, वीज बील भरणा तसेच वयोवृद्ध व गंभीर आजारी सभासद व ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते.’’
यावेळी उपाध्यक्षा मीना रिंगणे, संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. व्ही. के. मायदेव, महेश मजती, उमा तोरगल्ली, सीईओ डी. के. मायदेव आदी उपस्थित होते.

