राज्य ज्युनिअर टेनीकॉइट स्पर्धेत सांगलीचे वर्चस्व
- ratchl३०१.jpg- 
P25O01351
चिपळूण ः स्पर्धेत विजयी झालेले खेळाडू.
‘टेनीकॉइट’ स्पर्धेत सांगलीचे वर्चस्व
नागपूर उपविजयी; राज्यातील ६२ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः रत्नागिरी जिल्हा टेनीकॉइट असोसिएशन, आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ४२वी राज्यस्तरीय ज्युनिअर टेनीकॉइट अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा डेरवण येथे झाली. या स्पर्धेत मुले व मुलींमध्ये सांगलीने प्रथम तर नागपूरने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत राज्यातील ६२ संघांनी सहभाग नोंदवला.
राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख बळिराम गुजर, आदर्श प्रबोधिनीचे अध्यक्ष भय्या कदम, माजी सभापती धनश्री शिंदे, महाराष्ट्र टेनीकॉइट संघटनेचे महासचिव अनिल वरपे, सचिव मनिष काणेकर, अशोक ठोकळ, चंद्रकांत पिंपळे, कृष्णा ठाकरे आदींच्या उपस्थितीत झाला. डेरवण येथील क्रीडासंकुलात झालेल्या या स्पर्धेत भंडाराने तृतीय, अहिल्यानगरने चतुर्थ. मुलींच्या गटात सांगली संघाने विजेतेपद पटकावले तर नागपूर ग्रामीण संघ उपविजेता ठरला. पुणे शहर तृतीय, नागपूर शहर संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. यानिमित्त विशेष प्राविण्यप्राप्त खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसांनी गौरवण्यात आले. या वेळी जम्मू येथे २६ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १० मुले व १० मुलींची राज्यसंघात निवड करण्यात आली. या स्पर्धेतून राज्यातील टेनीकॉइट खेळाची वाढती लोकप्रियता आणि नवोदित खेळाडूंचा उत्साह दिसून आला. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा संघ दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा क्रीडाधिकारी विजय शिंदे, महासचिव अनिल वरपे, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

