इंदिरा गांधी, पटेल यांना अभिवादन
इंदिरा गांधी, पटेल 
यांना अभिवादन 
रत्नागिरी ः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवसनिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करेन, सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व कार्यामुळे देशाची एकता राखणे शक्य झाले तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करत आहे, अशी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. या वेळी प्र. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
--------- 
कुवारबांव परिसरात 
विजेचा खेळखंडोबा 
रत्नागिरी ः गेले सुमारे दीड दोन महिने रत्नागिरीतील साळवीस्टॉप, जे. के. फाईल्स, नाचणे, एमआयडीसी, कुवारबांव परिसरातील नागरिक वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याने त्रस्त झाले आहेत. दरदिवशी केव्हाही अनिश्चित काळासाठी वीज गायब होते. त्या संबंधी फोनवर तक्रार करायची तर वीज गेल्याबरोबर लगेच फोन व्यस्त लागतो, तो वीज येईपर्यंत लागतच नाही. अगदी नवरात्र, दिवाळी अशा सणासुदीच्या काळातही विजेचा खेळखंडोबा सुरूच होता. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्यापूर्वीच यात लक्ष घालून सुधारणा करावी, ही अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 
------ 
रेयांश बने याला 
तीन सुवर्णपदके 
संगमेश्वर ः ३५वी महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग स्पीड चॅम्पियनशिप २०२५-२६ ही रोलर स्केटिंग स्पर्धा अमेया स्पोर्ट्स क्लब विरार येथे झाली. या स्पर्धेत १० वर्षांखालील वयोगटातून रेयांश बनेने भाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने तीन सुवर्णपदके मिळवून विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. रेयांशने आतापर्यंत गोवा, म्हैसूर, केरळ आणि कोलकाता येथे चारवेळा महाराष्ट्राचे रोलर स्केटिंगसाठी नेतृत्व केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

