राजापूर-वर्षभराच्या बेगमीवर पावसामुळे पाणी
01526  
01529
वर्षभराच्या बेगमीवर पावसामुळे पाणी
धान्यासह वैरणीची शेतकऱ्याला चिंता; दोन्ही भिजल्याने नियोजन कोलमडले
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ः  शेतकऱ्यांना शेतामध्ये पावसाने आडवे झालेले भातपीक ऐन दिवाळीतच घरामध्ये आणावे लागले. पावसाने भिजून ओले झालेले भात घरात आणून पसरून ठेवल्याने कुबट वास येऊ लागला आहे. भाताच्या रचून ठेवलेल्या गवताच्या पेंढ्यामधून वाफा येतात. ते वाळवायचं कसे, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पावसाने भातशेतीचे बिघडलेले वर्षभराचे नियोजन सुधारायचे कसे? या काळजीने ग्रासले आहे. 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाची स्थिती आतबट्ट्याची राहिलेली असली तरी, यावर्षी भाताचे समाधानकारक उत्पादन आलेले असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले होते; मात्र, भातकापणीच्या हंगामामध्ये परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकाळाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भातकापणीचा हंगाम जोरात सुरू असताना पाऊस थांबायचं नाव घेताना दिसत नाही. दिवस-रात्री सातत्याने पाऊस पडत असल्याने भातकापणीच्या कामाच्या नियोजनाचा पुरता विचका झाला आहे. शेतात आडव्या पडलेल्या भाताला कोंब आले आहेत. झोडणीनंतरही ओले राहिलेले भात वाळवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे कुजलेल्या भाताच्या गवतातून वाफा येऊ लागल्या आहेत. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे जमिनीवर पडलेले भाताचे दाणे तसेच शेतामध्ये आहेत. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने शेतातील उरलेसुरलेले भात घरी कसे आणायचे, झोडणीनंतरचे गवत वाळणार कसे आणि गुरानां वैरण आणायची कुठून, असे अनेक प्रश्न पावसाने शेतकऱ्यांसमोर उभे केले आहेत. 
कोट
शेतामध्ये पावसाने आडवे झालेले भात पुन्हा एकदा रूजलं आहे. घरामध्ये आणलेले भात सुकवायचं कसं, असा प्रश्न आहे. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. आता नेमकं करायचं काय? हे प्रश्न सतावत आहेत.
- प्रकाश साळवी, शेतकरी, राजापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

