रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक विकासात योगदान

रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक विकासात योगदान

Published on

01749

रिझर्व्ह बॅंकेचे आर्थिक विकासात योगदान

पुनित पांचोली ः सावंतवाडीत वित्तीय समावेशन, रिकेवायसी कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः रिझर्व बँक ऑफ इंडिया ही केवळ नोटांशी संबंधित नाही, तर देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देते. शासनाच्या विविध योजनांची जनजागृती व त्याची परिपूर्ण माहिती पोहोचवणे, हा बँकेचा अविभाज्य घटक आहे, असे प्रतिपादन रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक पुनित पांचोली यांनी वित्तीय समावेशन व रिकेवायसी कार्यक्रमात सावंतवाडी येथे केले.
भारतीय रिझर्व बँक, वित्तीय समावेशन व विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली वित्तीय समावेशन व रिकेवायसी कार्यक्रमाचे आयोजन सावंतवाडी येथील मांगिरिश हॉल येथे केले होते. यावेळी बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक प्रमुख प्रमोदकुमार द्विवेदी, बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक डॉ. जावेद मोहनवी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक दया शंकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, रत्नागिरी बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर सागर नाईक, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे एलडीओ अरुण बाबू, डी.डी.एम. नाबार्डच्या दीपाली माळी, जिल्हा अग्रणी प्रबंधक (बँक ऑफ इंडिया) ऋषिकेश गावडे, महाराष्ट्र ग्रामीण बँक रिजनल मॅनेजर पद्मसिंग पाटील, स्टेट बँक ऑफ इंडिया सावंतवाडी मुख्य प्रबंधक पराग जाधव, माविमचे डीसीओ नितीन काळे, उमेदचे जिल्हा समन्वयक नीलेश वालावलकर, बँक ऑफ बडोदा रिजनल मॅनेजर प्रकाश जाधव, बँक ऑफ इंडियाचे सावंतवाडी वरिष्ठ प्रबंधक विनायक नार्वेकर आदी उपस्थित होते.
----
सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन
श्री. द्विवेदी म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना हे सर्वसामान्य जनतेचे मुख्य आधार आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. या योजना तळागाळात पोहोचल्या पाहिजेत. यासाठी बँकेची टीम कार्यरत आहे. जनजागृती महत्त्वाची आहे.’’ श्री. देवरे यांनी, सध्या समाजात अनेक भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये वाढती फसवणूक आणि सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी ग्राहकांनी सतर्क राहणे काळाची गरज आहे, असे सांगत सायबर क्राईमबाबत मार्गदर्शन केले.
---
लाभार्थ्यांना दोन लाखांचा परतावा
यावेळी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दोन लाखांचा परतावा देण्यात आला. यामध्ये मनोहर मेस्त्री आणि संदीप कदम यांचा समावेश होता. प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत चंद्रकला गावकर ५० हजार, नितीन दसा २५ हजार, गुलशन बुरण २५ हजार, नितीन मासकर १५ हजारांची मंजुरी पत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. विनायक नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. ऋषिकेश गावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com