कापणी रखडली, पिकांना कोंब; पंचनामे कधी?

कापणी रखडली, पिकांना कोंब; पंचनामे कधी?

Published on

01902
01903

कापणी रखडली, पिकांना कोंब; पंचनामे कधी?

शेतकऱ्यांचा प्रश्‍न; कनेडी पंचक्रोशीत ‘अवकाळी’ने भातपिकांचा नाश

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २ ः अवकाळी पावसामुळे तालुक्यातील भातशेती धोक्यात आली आहे. गेले पंधरा दिवस पावसाने कहर केला आहे. कनेडी पंचक्रोशीला गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगले झोडपून काढले आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम भातपीक कापणीवर झाला आहे. त्यामुळे ही कापणी अद्याप रखडल्याने शेतकरी चिंतेत आहे.
चक्रीवादळाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भात पेरणी लवकर झाली. पेरणीनंतर १३० दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे भातपीक तयार झाले आहे. गेले काही दिवस सकाळपासून पावसाला सुरुवात होत असल्याने कापणीच्या कामाला विलंब होऊ लागला आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या भात पिकाला कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे. काही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले आहेत, तर काही शेतीचे राहिले आहेत. सातत्याने पाऊस कोसळत असल्यामुळे पंचनामे करण्यातही अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. सखल भागांमध्ये अद्यापही पाणी साचून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भात कापणीची कामे आवरता येत नाहीत, अशी स्थिती आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जात आहे.
----
हातातोंडाशी आलेला घास हिरावला!
१५ दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. सततच्या पावसामुळे भातशेती ओलितात अडकली असून पिकं भुईसपाट झाली आहेत. भातपीक तयार असूनही ओल्या शेतामुळे कापणीचं काम पूर्णपणे थांबलं आहे. पूर्वीच्या चक्रीवादळानेही शेतीला फटका बसला; त्यात पावसाने आणखी भर घातली. अद्यापही शेतात पाणी असल्याने पिकं सडू लागली आहेत. सातत्याने पाऊस सुरू असल्याने पंचनाम्याचं कामही पूर्ण झालेले नाही. शासनाने त्वरित नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला असून शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com