पन्हळे धरणाच्या दुरुस्तीने 330 हेक्टरला शेतीला लाभ
rat२p४.jpg
०१९१२
लांजा तालुक्यातील पन्हळे धरण.
पन्हळे धरणाची दुरुस्ती लवकरच मार्गी
पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार; आमदार सामंत यांच्याकडून पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २ ः तालुक्यातील पन्हळे धरणाच्या दुरुस्तीची काम लवकरच मार्गी लागणार आहे. धरणाची दुरूस्ती झाली तर पन्हळे व आजूबाजूच्या गावातील ३३० हेक्टर शेतीला फायदा होणार असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. या दुरूस्तीसाठी आमदार किरण सामंत यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
लांजा तालुक्यातील पन्हळे गावाजवळ २००१ मध्ये पन्हळे धरण बांधण्यात आले होते. या धरणाची लांबी २०० मीटर असून पाणीसाठा ३.५२६ दलघमीटर आहे. या धरणामुळे आजूबाजूच्या गावातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धरणाचे बांधकाम करण्यात आले. कालांतराने या धरणाला गळती लागल्याने त्यातील पाण्याचा उपयोग स्थानिक लोकांना होत नव्हता. धरणाची गळती थांबवण्यासाठी उपयोजना करा अशी मागणी स्थानिक लोकांनी याबाबत आमदार किरण सामंत यांच्याकडे केली होती. आमदार सामंत यांनी शासनस्तरावर सतत पाठपुरावा केल्यामुळे या धरणाच्या दुरुस्तीबाबत पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही सुरू झाली होती. पन्हळे धरणाची गळती दुरुस्तीची कामे झाल्यानंतर पन्हळे व आजूबाजूच्या गावातील ३३० हेक्टर शेतीला फायदा होणार असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
चौकट
अहवाल अंतिम टप्प्यात
गळती प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेकडून अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच पुणे येथील केंद्रीय जल ऊर्जा संवर्धन केंद्राचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. तो आल्यानंतर पन्हळे धरणाच्या दुरूस्तीचे अंदाजपत्रक तयार करून मान्यतेसाठी शासनाला सादर करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

