रानफुलांत कुरडूचे सौंदर्य लक्षवेधी
- rat३p९.jpg-
P२५O०२१२८
खेड ः टिकाऊपणाने वेगळेपण जपणारे कोकणातील रानफूल कुरडू.
---
रानफुलांत कुरडूचे सौंदर्य लक्षवेधी
कोकणातील सड्यांवर आढळ; टिकाऊपणा विलक्षण
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : श्रावण महिन्याच्या अखेरीस निसर्ग आपले रंग उधळून कूस बदलून निघून जातो. त्यानंतर पावसाने तृप्त झालेल्या भूमीत रानफुलांचा बहर चोहीकडे दिसू लागतो. ओढे, डोंगर, रानशिवार फुलांनी सजू लागतात. या रानफुलांच्या गर्दीत कुरडूचे फूल आपले वेगळेपण दाखवत असते.
कुरडूचे फूल केवळ सौंदर्यापुरते मर्यादित नाही. त्याचा टिकाऊपणा इतका विलक्षण आहे की, त्याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नवान्न पौर्णिमेला घराघरात बांधल्या जाणाऱ्या नव्यात कुरडूच्या फुलाला खास स्थान असते. ही फुले सहज न कोमेजणारी असल्याने ती श्रद्धेचे प्रतीक मानली जातात. स्पर्श केला असता ती कृत्रिम भासतात; पण तेच त्या फुलांचे निसर्गदत्त कवच असते. मोत्यासारखी शुभ्र नंतर हलक्या जांभळट छटा धारण करणारी ही फुले मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतात. गंध नसतानाही त्यांचा मोह या जीवांना आवरता येत नाही. पावसाळ्यात शेतांच्या बांधांवर आणि मोकळ्या शिवारात कुरडू मोठ्या प्रमाणावर उगवतो. साधारण गवतासोबतच वाढणारे हे रोप फुलू लागले की, त्याचे सौंदर्य दुरूनच उठून दिसते.
पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली की, अनेक रानफुले अंतर्धान पावतात; मात्र कुरडूचा बहर कार्तिकापर्यंत टिकतो. टिकाऊपणाचे हेच त्याचे गुपित सामर्थ्य आहे. सध्या कोकणात हिरव्या जाळ्यांवर कुरडूच्या शुभ्र जांभळ्या फुलांनी सजलेले शिवार म्हणजे जणू निसर्गाने घातलेला रंगीत गालिचाच, असे वर्णन करता येईल. या फुलांनी निसर्ग अधिक उजळून गेला आहे.
---
चौकट
निसर्गाचा टिकाऊ अलंकार
कुरडू हे फक्त रानफूल नाही, तर निसर्गाचा टिकाऊ अलंकार आहे. अल्पायुषी रानफुलांच्या गर्दीत दीर्घकाळ बहर टिकवून ठेवणारे हे फूल स्थैर्य आणि सहनशीलतेचा संदेश देते. निसर्गाच्या या चमत्कारिक निर्मितीकडे पाहताना असं वाटतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

