वक्तृत्व स्पर्धेत इम्तियाज सिद्दिकी यांना द्वितीय क्रमांक
- rat३p१४.jpg-
२५O०२१३९
मुंबई ः येथे झालेल्या कार्यक्रमात इम्तियाज सिद्दिकी प्रशस्तिपत्रक स्वीकारताना.
---
वक्तृत्वमध्ये इम्तियाज सिद्दिकी द्वितीय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूलचे विज्ञानशिक्षक इम्तियाज सिद्दिकी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
नुकताच कालिदास नाट्य सभागृह मुलुंड मुंबई येथे पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा प्रशस्तीपत्र, दर्जेदार भेटवस्तू, मानाचा फेटा, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विधान परिषद आमदार मिहिर कटारिया, विक्रम पाटील, संजय जगताप, श्रीकांत भारती तसेच आरबीआय व नाबार्डचे संचालक सतीश मराठे आणि सेकंडरी स्कूल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व पतसंस्थेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सिद्दिकी यांचे प्रशालेच्यावतीने आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले.
---

