कळसावलीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार
- rat३p४.jpg-  
२५O०२११८  
राजापूर ः कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे प्रदान करण्यात येत असलेला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार स्वीकारताना सरपंच देवेश तळेकर, उपसरपंच जयवंत शेडेकर, ग्रामपंचायत अधिकारी सोनाली आराख.
कळसवलीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई (महाराष्ट्र) यांच्यावतीने दरवर्षी ‘आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार’ दिला जात असून, यावर्षीच्या ’आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराची’ तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायत मानकरी ठरली आहे. त्याबद्दल कळसवली ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, प्रमुख अतिथी पद्मश्री मुरलीकांत पेटकर, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, सुप्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर आदी मान्यवरांच्या हस्ते कळसवली ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार कळसवलीचे सरपंच देवेश तळेकर, उपसरपंच जयवंत शेडेकर, ग्रामपंचायत अधिकारी सोनाली आराख आदींनी स्वीकारला. कळसवली ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान, जलव्यवस्थापन, महिला सबलीकरण, शिक्षण, हरित उपक्रम, डिजिटल ग्रामपंचायत आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन कळसवली ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

