अंतिम आरक्षण जाहीर

अंतिम आरक्षण जाहीर

Published on

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे
अंतिम आरक्षण जाहीर
रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभाग व निर्वाचन गणांची अंतिम आरक्षण अधिसूचना काल (ता. ३) जाहीर झाली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय, सर्व तहसीलदार कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयाच्या फलकावर व जिल्हाधिकारी यांच्या या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या १ ऑक्टोबर २०२५ च्या आदेशानुसार ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण ५६ गट असून, त्यातील २८ गट हे महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत. अनुसूचित जातीसाठी दोन गट असून, एक गट महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी एक गट आरक्षित असून तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे. ओबीसीसाठी १५ गट असून त्यातील ८ गट महिलांसाठी तर सर्वसाधारण ३८ गट असून त्यातील १८ गट हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या नऊ पंचायत समित्या असून, त्यासाठी ११२ गण आहेत. या सर्व गट व गणांचे अंतिम आरक्षण अधिसूचना जारी झाली आहे.


विश्वकप मिळवल्याचा
खेडमध्ये आनंदोत्सव
खेड ः महिला वनडे विश्वकपमध्ये अंतिम सामन्यात भारतीय रणरागिणींनी दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आणि विश्वचषकावर भारतीय तिरंगा अभिमानाने झळकवला. हा आनंद खेडमधील क्रीडाप्रेमींनी साजरा केला. माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, रहिम सहिबोले, भालचंद्र (नंदू) साळवी, रवींद्र नांदगावकर, सर्वेश पवार आदी उपस्थित होते.

कार्तिकी एकादशीस
भाजपतर्फे सरबत वाटप
रत्नागिरी : कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी शहराच्यावतीने भाविकांसाठी मोफत कोकम सरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ८ हजार १०० भाविकांना सेवा देण्यात आली. या उपक्रमात भाजप महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष परशुराम ढेकणे यांच्यासह सोनाली केसरकर, नीलेश आखाडे, संदीप सुर्वे, संतोष सावंत, समीर वस्ता, केतन कडू, सिद्धेश कडू, सचिन गांधी, गुरुप्रसाद फाटक, अमित विलणकर, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, प्रसाद बाष्ट्ये, मुक्ता बाष्ट्ये, तुषार देसाई, विनय मसुरकर, मसुरकर, कामना बेग, प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, प्रवीण रायकर, सिद्धेश नाईक, प्रवीण ढेकणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाविकांची सेवा हेच आमचे कर्तव्य असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला, असा संदेश आयोजकांकडून देण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com