मसदे-वडाचापाट येथे आज त्रिपुरारी उत्सव
02381
मसदे-वडाचा पाटला
आज त्रिपुरारी उत्सव
मालवण : श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास संलग्न श्री स्वामी समर्थ मठ, मसदे-वडाचा पाट येथे उद्या (ता. ५) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी सातला दुग्धाभिषेक, नऊला सत्यनारायण महापूजा, अकराला नैवेद्य व आरती, बाराला गावडे काका महाराजांचे आगमन व मार्गदर्शन, एकला महाप्रसाद, सायंकाळी साडेसहाला दीपोत्सव, सातला दैनंदिन आरती आणि रात्री आठला मुणगे-देवगड येथील बुवा राजेंद्र प्रभू यांचे भजन होईल. कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
फलाहारी महाराज
आज तळवडेत
सावंतवाडी : तळवडे महाळाईवाडी येथे सद्गुरू फलाहारी महाराजांचे उद्या (ता. ५) आगमन होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी आठला महाराजांचे आगमन, दहाला पाद्यपूजा, अकराला सत्यनारायण महापूजा, दुपारी एकला आरती व तीर्थप्रसाद, दोनला महाप्रसाद, तसेच चारला मिरवणूक, सिद्धेश्वर मंदिरात रात्री नऊला भजन व आरती होणार आहे. गुरुवारी (ता. ६) सकाळी आठला पाद्यपूजा, आरती व तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अर्जुन आचरेकर यांनी केले आहे.
---------------
कणकवलीत
पंचनामे सुरू
कणकवली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या सूचनेनुसार नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम तालुक्यात सुरू आहे. तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ७० हेक्टर भातशेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. कापणीस तयार असलेल्या, तसेच कापलेले भात कुजल्याची अनेक ठिकाणांहून नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे उभ्या भाताला अंकुर आले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
---
केसरी येथे आज
त्रिपुरारी उत्सव
सावंतवाडी : सह्याद्री पट्ट्यातील जागृत देवस्थान असलेल्या केसरी येथील स्वयंभू देवस्थानचा त्रिपुरारी उत्सव उद्या (ता. ५) साजरा केला जाणार आहे. केसरी, देवसू आणि दाणोली या तीन गावांचा अधिपती असलेल्या या देवस्थानात गोवा, कोल्हापूरसह जिल्ह्यातील भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. सायंकाळी उशिरा शेकडो पणत्या प्रज्वलित करून हा उत्सव साजरा केला जातो. सूर्यास्तावेळी केली जाणारी देवाची आरती विशेष आकर्षण असते. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
----
आजगाव येथे
आज जत्रोत्सव
आरोंदा : आजगावचे जागृत देवस्थान वेताळेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. ५) साजरा होणार आहे. कार्यक्रमात केळी ठेवणे, ओटी भरणे, पालखी प्रदक्षिणा, फटाक्यांची आतषबाजी आणि आजगाव दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तसेच गावातील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी (ता. ६) साजरा करण्यात येईल. यामध्ये केळी ठेवणे, रात्री पालखी प्रदक्षिणा आणि आजगावकर दशावतार कंपनीचे नाटक सादर होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

