झाराप भावई भजन मंडळ प्रथम

झाराप भावई भजन मंडळ प्रथम

Published on

swt51.jpg
02561
साळगावः विठ्ठल-रखुमाई भक्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साळगाव पंचक्रोशी मर्यादित भजन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या झाराप भावई मंडळाला गौरविताना मान्यवर.

झाराप भावई भजन मंडळ प्रथम
साळगाव येथील स्पर्धाः केरवडे-बोरदवाडी द्वितीय, तुळसुली तृतीय
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः साळगाव येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात वार्षिक हरिनाम सप्ताहानिमित्त श्री विठ्ठल-रखुमाई भक्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साळगाव पंचक्रोशी मर्यादित भजन स्पर्धेत झारापच्या भावई मंडळाने (बुवा साहिल बोभाटे) प्रथम क्रमांक प्राप्त केला. केरवडे-बोरदेवाडी येथील जगन्नाथ मंडळाने (बुवा शाम चव्हाण) द्वितीय व तुळसुलीतील महापुरुष मंडळाने (बुवा गुरुप्रसाद आजगावकर) तृतीय क्रमांक मिळविला. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये १४ मंडळांनी सहभाग घेतला.
स्पर्धा परीक्षक संगीत विशारद योगेश प्रभू बुवा यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी साळगाव परिसरातील सर्व विठ्ठलभक्त उपस्थित होते. स्पर्धेला भजन रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा उर्वरित निकाल असा ः उत्तेजनार्थ प्रथम श्री देव रामेश्वर मंडळ (तेरसेबांबर्डे, बुवा केदार सडेकर), उत्तेजनार्थ द्वितीय श्री रामेश्वर माऊली चावडी महापुरुष मंडळ (घावनळे, बुवा स्वप्नील सावंत), उत्कृष्ट गायक साहिल बोभाटे (भावई मंडळ, झाराप), हार्मोनियम प्रताप भोई (नवतरुण युवक मंडळ, नानेली), तबला सिद्धेश वेंगुर्लेकर (कुलदेवता मंडळ, साळगाव-गावठणवाडी), पखवाज प्रणव परब (जगन्नाथ मंडळ, केरवडे बोरदेवाडी), पखवाज प्रोत्साहनपर किरण सावंत (कुलदेवता मंडळ, साळगाव - गावठणवाडी), झांजवादक चिरायू भोई (नवतरुण युवक मंडळ, नानेली), कोरस-स्वामी समर्थ मंडळ (तुळसुली) यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेतील सांघिक विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ४ हजार, ३ हजार रुपये, तसेच उत्तेजनार्थ आणि वैयक्तिक विजेत्यांना बक्षिसे, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक योगेश प्रभू व विठ्ठल रखुमाई मंदिर हरिनाम सप्ताह सर्व कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. हृदयनाथ गावडे, संकेत सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com