केशर निर्गुणला राष्ट्रीय उपविजेतेपद
swt52.jpg
02567
केशर निर्गुण
केशर निर्गुणला राष्ट्रीय उपविजेतेपद
कॅरम स्पर्धेत यशः ज्युनियर गटात मधुरा, मिहिर, आयुष चमकले
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे १ ते ४ नोव्हेंबर कालावधीत ५० वी राष्ट्रीय कुमार गट कॅरम स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सावंतवाडी येथील केशर निर्गुण हिने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद पटकावत सिंधुदुर्गचा राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा नावलौकिक केला. या स्पर्धेमध्ये ती एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे सहभागी झाली होती.
सिंधुदुर्गची दुसरी आघाडीची कॅरमपटू दीक्षा ही या स्पर्धेत याच वयोगटातून सहभागी झाली होती. उपउपांत्य फेरीच्या आधीच या दोघी एकमेकींसमोर आल्या. दीक्षावर मात करत केशरने उपउपांत्य फेरी गाठली. उपउपांत्य फेरीत दिल्लीच्या साक्षी गेहलोतवर तर उपांत्य फेरीत तामिळनाडूच्या व्ही. मित्रा हिच्यावर दोन सरळ सेटमधे सहज मात करत केशरने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत केशरची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकर हिच्याशी पडली. समृद्धीने उपांत्य फेरीत पहिला सेट गमावल्यानंतर संघर्षपूर्ण लढतीत तामिळनाडूच्या भरगत निशावर विजय मिळवला. अंतिम फेरीत समृद्धीने केशरला प्रतिकाराची फारशी संधी न देता १८-०६, २१-०६ असा सरळ सेटमध्ये तिच्यावर विक्रम मिळवला. त्यामुळे केशरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मधुरा देवळे हिने १८ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांकासह सुवर्ण, मिहिर शेखने २१ वर्षे मुलांच्या गटात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. आयुष गरुड याने १८ वर्षे मुले गटात तिसऱ्या क्रमांकासह कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे विजेत्या मधुरा व मिहिर यांना प्रत्येकी १० हजार रुपये, तर आयुषला ५ हजार रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले. तसेच तनया पाटील, सिमरन शिंदे, सोनाली कुमारी यांनी अनुक्रमे ५, ६, ७ तर आकांक्षा कदमने ५, ओंकार वडर ६ आणि ओजस जाधव याने चौथा क्रमांक मिळवून स्पर्धेत महाराष्ट्राची छाप पाडली. ज्युनियर मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात तामिळनाडूला हरवून सुवर्णपदक पटकावले. मुलांचा संघ तामिळनाडू विरुद्ध अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने त्यांना उपविजेतेपदाचा मान मिळाला. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने विजयी संघास २१ हजार व उपविजेत्या संघास १४ हजारांचे बक्षीस देण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

