सोनुर्ली जत्रोत्सव विशेष

सोनुर्ली जत्रोत्सव विशेष

Published on

पुरवणी डोके - सोनुर्ली जत्रोत्सव विशेष

swt55.jpg ते swt58.jpg
02570
02573
02574
02575
श्री देवी माऊली
swt59.jpg ते swt510.jpg
02576
02562
सोनुर्ली ः श्री देवी माऊली मंदिर
swt511.jpg
02563
सोनुर्ली ः श्री देवी माऊली जत्रोत्सवात हजारो भाविक लोटांगण घालून नवसफेड करतात.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान
सोनुर्लीची श्री देवी माऊली

लीड
दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी (ता. ६) होत आहे. ‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून ओळख असलेल्या या उत्सवाला गोव्यासह राज्यभरातून भाविकांचा जनसागर लोटणार आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने...
....................
दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी सोनुर्ली माऊलीची ओळख आहे. या देवीचा वार्षिक जत्रोत्सव ‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून सुप्रसिद्ध असून या जत्रोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भक्तगणांबरोबरच गोवा, कर्नाटक, बेळगाव, मुंबई, कोल्हापूर, गुजरात तसेच अन्य राज्यांतूनही लाखो भाविक भक्त देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला उपस्थित राहतात. काही भाविक विशेष करून लोटांगणे पाहण्यासाठी दाखल होतात. ‘याची देही याची डोळा’ लोटांगणाचा सोहळा व देवी माऊलीच्या दर्शनाने भाविक धन्य होतात.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या व सांस्कृतिक माहेरघर ठरलेल्या कोकणात अनेक देवतांची सुप्रसिद्ध स्थळे आहेत. त्यात अगदी तळकोकणात सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली हे गाव श्री देवी माऊलीच्या पतित पावन वास्तव्याने पुनित जाहले आहे. सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनलेल्या या माऊलीचा जत्रोत्सव ‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून जिल्हाभरातच नव्हे तर मुंबईसहित गोमंतकातही प्रसिद्ध आहे. माऊलीचे हजारो भक्तगण सदैव माऊलीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. माऊलीचा जत्रोत्सव ही तर सर्व भक्तगणांसाठी पर्वणीच ठरते.
या दिवशी सोनुर्ली पंचक्रोशीत नवचैतन्य पसरते. सोनुर्ली गावात मोठ्या उत्साहात हा जत्रोत्सव साजरा केला जातो. या दिवशी देवीचा भक्त जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी माऊलीच्या दर्शनासाठी येतोच येतो.
सुमारे ५०० वर्षांपूर्वीच्या श्री देवी माऊलीच्या पुरातन मंदिराची वास्तू भव्य-दिव्य व्हावी, असा काही वर्षांपूर्वी भक्तगणांनी संकल्प सोडला. माऊलीच्या कृपेने तमाम भक्तगणांच्या सहकार्यातून हा संकल्प पूर्णत्वास आला. अलीकडेच वर्षभरापूर्वी श्री देवी माऊलीच्या पाषाणरुपी मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. हा सोहळा भव्य दिव्य स्वरुपात, लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला. माऊलीच्या मंदिराचे दर्शन होताच मन तृप्त होऊन जाते. गाभाऱ्यात शिरताच जागृत देवस्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या श्री देवी माऊलीचे मनमोहक रुप पाहताच मन प्रसन्न होते. दूरवरून आलेला भाविक भक्त माऊलीच्या दर्शनाने कृतार्थ होतो.
श्री देवी माऊली मंदिराच्या बाजूला श्री रवळनाथ, श्री लिंगायत, श्री पावणादेवी यांची मंदिरे आहेत. सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावांचे आद्यदैवत म्हणून श्री देवी माऊलीला भजले जाते. या देवीला ‘महिषासुरमर्दिनी’ असेही संबोधिले जाते. श्री देवी माऊलीच्या उत्सवाची सुरुवात कार्तिक पौर्णिमेपासून होते. पौर्णिमेच्या दिवशी मूळ घरातील (मांड) उत्सवमूर्ती सर्व लवाजम्यासहित सवाद्य मंदिरात प्रवेश करते. तेथे देवीला चुरमुऱ्यांचा नैवेद्य दाखवून ग्रंथवाचन केले जाते. हे ग्रंथवाचन त्रिपुरारी पौर्णिमा ते जत्रेच्या उत्सवापर्यंत नियमितपणे केले जाते. तसेच रोज रात्री देवीस्तवन व महाआरती केली जाते. कोजागरी पौर्णिमा, दीपावली, तुलसी विवाह व जत्रेदिवशी देवीची मूर्ती स्थानापन्न केलेल्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढत मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. यावेळी मंदिरासमोरील दीपस्तंभ शेकडो दीपज्योतींनी उजळतो.
जत्रोत्सवादिवशी सायंकाळी ४ वाजता मळगाव येथील कुळघरातून तरंगकाठी व मायापूर्वचारी देवाची पालखी ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत निघते. मळगाव येथील मानकऱ्यांसहित भाविक भक्तगण या पालखीसोबत येतात.
सोनुर्ली-मळगावच्या सीमेवर बांदा येथे सोनुर्लीचे मानकरी निशाणकाठीसह या पालखीच्या स्वागतासाठी परंपरेप्रमाणे येतात. दोन्ही गावचे मानकरी मिळून यानंतर देवीला नारळ ठेवतात. यानंतर ही पालखी वाजतगाजत सर्व मानकऱ्यांसहित सोनुर्लीच्या चव्हाट्यावर नेली जाते. या ठिकाणी पालखीत माऊलीची उत्सवमूर्ती ठेवण्यात येते व लवाजम्यासहित वाजतगाजत, आतषबाजीत ही मूर्ती पालखीसह मंदिरात आणली जाते. यानंतर मुख्य जत्रोत्सव सुरू होतो. तत्पूर्वी दिवसभर मंदिरात दर्शन व नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम सुरू असतात. माऊलीची ओटी भरण्यासाठी महिलांचीही मोठी गर्दी होते. यावेळी सकाळपासूनच मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात.
लोटांगणापूर्वी काही वेळ दर्शन व नवस फेडण्याचा कार्यक्रम बंद केला जातो. त्यानंतर लोटांगण सोहळा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराच्या आवारातील साफसफाई केल्यावर तुळाभार कार्यक्रम सुरू होतो. यावेळी नवस बोललेले लोक तुळाभार करतात. यामध्ये केळी, नारळ, तांदूळ, साखर, गूळ अशा पाच जिन्नसांनी तुळाभार केला जातो. हा कार्यक्रम दुपारपर्यंत चालतो.
या कार्यक्रमानंतर अंधार उभे करून जत्रोत्सवाचा कार्यक्रम चांगल्याप्रकारे झाल्याचा कौल घेतला जातो. यावेळी समंधबाधा झालेली मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. वाद्य वाजविल्यानंतर त्यांच्या अंगात संचार येतो. अशी समंधबाधा झालेल्यांची यथाविधी त्यातून सुटका करण्यात येते. हे सर्व कार्यक्रम झाल्यावर सर्व मानकरी, ग्रामस्थ, भाविक तरंगकाठीसह मिरवणुकीने कुळघराकडे जातात. तेथे रात्री जागर व नैवेद्य दाखविला जातो. त्या ठिकाणी तरंगकाठीची विधीवत पूजा करून तरंगकाठी ठेवण्यात येते. यानंतर जत्रोत्सवाची सांगत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com