विद्यार्थ्यांना युध्दकलेसह शस्त्रास्त्रांचे धडे

विद्यार्थ्यांना युध्दकलेसह शस्त्रास्त्रांचे धडे

Published on

swt515.jpg
02583
कामळेवीर ः येथील शाळेत ''इतिहासाची साधने'' विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर राणे व इतर मान्यवर.

विद्यार्थ्यांना युध्दकलेसह शस्त्रास्त्रांचे धडे
कामळेवीर शाळेत उपक्रमः ज्ञानेश्वर राणेंकडून ऐतिहासिक साधनांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कामळेवीर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्गरक्षक प्रतिष्ठान यांच्यावतीने ‘इतिहासाची साधने’ या विषयावर शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सदस्य ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील विविध साधनांची ओळख करून दिली. त्यांनी मोडी पत्रे, ताम्रपत्र, वीरगळ तसेच गड-कोट-दुर्ग यांचे छायाचित्र दाखवून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजावले. यावेळी वाघनखे, ढाल, बिचवा, कट्यार, कुऱ्हाड, मराठा गुर्ज, दांडपट्टा, नागिन तरवार, मराठा धोप, राजपुत तरवार, जिरेटोप यांसारखी दुर्मीळ ऐतिहासिक शस्त्रे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून ती हाताळण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी इतिहासाशी प्रत्यक्ष साक्षात्कार साधत अनोखा अनुभव घेतला. श्री. राणे यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ग्रंथांची ओळख, वाचनाचे महत्त्व तसेच ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचे भान याबाबत मार्गदर्शन केले. दोन्ही संस्थांकडून होत असलेल्या संवर्धन कार्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या उपक्रमास गंगाधर रेडकर, घनश्याम आळवे, गंगाधर गोवेकर, यशवंत वराडकर, विजय वराडकर, रुपेश चांदरकर, मुख्याध्यापक विजय कदम, अनघा निरवडेकर, विलास गोठोस्कर, भालचंद्र आजगावकर, रुचिता राऊळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com