4 वर्षानंतर चिपळूण पालिकेला मिळणार सेवक

4 वर्षानंतर चिपळूण पालिकेला मिळणार सेवक

Published on

-rat५p११.jpg-
२५O०२५९५
चिपळूण पालिका
----
विकासाच्या मुद्द्यांवरच ठरणार सत्तेचे भवितव्य
चिपळुणात राजकीय हालचालींना वेग; चार वर्षानंतर मिळणार लोकसेवक
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ ः येथील पालिकेची निवडणूक जाहीर झाली असून, लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी शासकीय पातळीवर लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे आता प्रत्येकजण विकासाचे मुद्दे पुढे करून राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लवकरच आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा दणाणणार आहेत. पालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षाचे नेते सरसावले आहेत. विशेष म्हणजे चार वर्षानंतर पालिकेला सेवक मिळणार आहेत.
पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे लवकरच रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. २०१६ मध्ये पालिकेची निवडणूक झाली तेव्हा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही; मात्र तडजोड करून सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी सत्ता सांभाळली. नगराध्यक्ष जनतेतून निवडून द्यायचा होता त्यामुळे भाजपच्या सुरेखा खेराडे सलग पाच वर्ष नगराध्यक्षपदावर राहिल्या. त्यांनी सुरुवातीला शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून येऊनही शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले. काँग्रेस, राष्ट्रवादीचे कमी नगरसेवक असून सुद्धा शिवसेनेला बाहेर ठेवून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने सत्तेतील बहुतांशी सभापतिपद दोन्ही काँग्रेसला दिले. त्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आले. त्या वेळी पालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपची साथ सोडावी लागली.
पालिकेतही महाविकास आघाडी स्थापन झाली. पाच वर्षात राज्यसरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी शहरात आला. त्यानंतर निधी कमी पडला म्हणून पालिकेच्या ठेवीही मोडण्यात आल्या. नगराध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर अनेकवेळा आक्षेप घेण्यात आले. त्यांच्यावर आरोपही झाले. नगराध्यक्षांना त्यांच्या केबिनमध्ये डांबून ठेवणे, पालिका कर्मचाऱ्यांना घेराव घालणे, नव्याने बांधलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील खुर्च्यांची मिरवणूक काढण्याचे प्रकार घडले होते; मात्र प्रशासकीय राजवट निर्माण झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी सर्वच गारठले. आपली कामे व्हायला पाहिजेत म्हणून प्रशासकाला जास्त महत्त्व देऊ लागले. या दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेली आणि महायुतीचे सरकार राज्यात आले. पूर्वी पालिका फंड वगळता आमदार, खासदार किंवा इतर कोणत्याही फंडातून निधी खर्च करायचा असेल तर पालिकेचा ठराव महत्त्वाचा होता.
---
चौकट
शहरातील कामांसाठी निधी कुठून येतो?
अलीकडे शहरात कोणत्या निधीतून काम होत आहे, याची माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनाही नव्हती. पालिकेने एखादे गटार बांधले असेल तरीही सहा महिन्यानंतर जिल्हा नियोजनामधून त्या गटारावर निधी खर्च होत असल्याचे प्रकार शहरात घडले. चार वर्षानंतर का होईना निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी इच्छुकांची तयारी मागील सहा महिन्यापासून सुरू आहे.

चौकट
२०१६ ला निवडून आलेले नगरसेवक
शिवसेना* ११
काँग्रेस* ५
राष्ट्रवादी काँग्रेस* ४
भाजप* ४ (+ नगराध्यक्ष)
अपक्ष* २

चौकट
२०२५ ची प्रभाग रचना
मतदार* ४२ हजार ६००
जागा* १४ प्रभाग २८ नगरसेवक
स्वीकृत नगरसेवक* ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com