ठाकरे शिवसेनेच्या सीमा मठकर उमेदवार
swt५२०.jpg
०२६०७
सावंतवाडी ः शहर संघटक निशांत तोरसकर यांनी पत्रकार परिषद घेत सिमा मठकर यांचे नाव जाहीर केले. यावेळी उपस्थित अन्य पदाधिकारी व मान्यवर.
ठाकरे शिवसेनेच्या सीमा मठकर उमेदवार
सावंतवाडी नगराध्यक्ष लढत ः पत्रकार परिषद घेत नाव जाहीर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः पालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून माजी आमदार (कै.) जयानंद मठकर यांच्या स्नुषा सिमा मठकर यांचे नाव आज जाहीर केले. शहर संघटक निशांत तोरसकर यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांना उपस्थित करत त्यांच्या नावाची घोषणा केली. या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार असून विषयी जागेवर नगरसेवक उमेदवार उभे करण्याची तयारी आम्ही केली असल्याचेही श्री. तोरस्कार यांनी स्पष्ट केले.
शहरातील आपल्या संपर्क कार्यालयात श्री. तोरसकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, आशिष सुभेदार, शैलेश गौंडाळकर, शब्बीर मणियार, शेखर सुभेदार, कृत्तिका कोरगावकर, श्रुतिका दळवी, समीरा खलील, जावेद शेख आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, "पालिकेची निवडणूक लढवताना मित्र पक्षांना दुखावणार नाही. मात्र, अद्याप तरी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची समन्वयाची भूमिका निभवताना दिसत नाही. ते जेव्हा येतील त्यावेळी उमेदवारी वाटाघाटीसाठी चर्चा केली जाईल. परंतु, सध्या तरी आम्ही पूर्ण ताकदीनीशी या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केला असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा ठाकरे शिवसेनेचाच असावा, असा एकमुखी निर्णय शहर कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे आघाडी झाल्यास नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा ठाकरे शिवसेनेचाच असणार आहे. त्यासाठी आम्ही मठकर यांचे नाव एक मताने ठरवले असून लवकरच त्यांचा ठाकरे शिवसेनेमध्ये खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात येणार आहे."
श्री. तोरसकर पुढे म्हणाले, "नगराध्यक्षपदासाठी आम्ही मठकर यांना विनंती केली आहे. त्या देखील इच्छुक आहेत. माजी आमदार (कै.) जयानंद मठकर यांचा वारसा त्यांना लाभला आहे. शिवाय त्यांचे सामाजिक कार्य सुद्धा चांगले आहे. प्रशासकीय ज्ञान त्यांना आहे."
मठकर म्हणाल्या, "मी २०१६ ला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. परंतु, उमेदवारी न मिळाल्याने मी अपक्ष निवडणूक लढवली. यावेळी ठाकरे शिवसेनेकडून मला समोरून विचारणा करण्यात आली आहे. त्यांनी माझी कुवत ओळखून तशा प्रकारची विनंती माझ्याकडे केली आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन निवडणूक लढवण्याचा विचार केला आहे. लवकरच मी ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहे."
--------------
चौकट
पैशाचं राजकारण मोडीत काढू
यावेळची निवडणुक ही काहीशी वेगळी असणार आहे. यावेळी पैसे वाटून निवडून येऊ शकत नाही, इथला मतदार विकला जात नाही हे मतदार दाखवून देतील. पैशाचं राजकारण आम्ही मोडीत काढू. तर समिरा खलील, कृतिका कोरगावकर, दुराली रांगणेकर, श्रृतीका दळवी, उमेश कोरगावकर, शेखर सुभेदार, शैलेश गवंडळकर हे नगरसेवक पदांसाठी इच्छुक आहेत, असे श्री. तोरसकर यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

