मंडणगडमध्ये उद्या सार्धशती महोत्सव

मंडणगडमध्ये उद्या सार्धशती महोत्सव

Published on

मंडणगडमध्ये उद्या
सार्धशती महोत्सव
मंडणगड ः मंडणगड शहरात वंदे मातरम् गीताच्या सार्धशती म्हणजेच १५० वर्षे महोत्सवाचे आयोजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या क्रीडांगणावर उद्या (ता. ७) सकाळी ९.३० ते १०.४५ या वेळेत हा सोहळा होणार आहे. राज्यभरातील सर्व तालुक्यांमध्ये वंदे मातरम् या गीताचे सामूहिक गायन होणार असून, देशभक्तीची भावना जनमानसात दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कार्यक्रमात पद्मश्री दादा इदाते, प्रा. दिगंबर कुलकर्णी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाला शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील आजी-माजी प्रशिक्षणार्थी, पालक, शासकीय कर्मचारी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.

‘नाथ पै’च्या दोघींची
जिल्हा कबड्डी संघात
पावस ः लांजा तालुक्यातील हर्चे येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या विद्यार्थिनी त्रिधा भरणकर व हंसिका भोवड (दहावी) यांची पुणे येथे होणाऱ्या ३६ व्या किशोर/किशोरी गट राज्य कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा किशोरी गट संघात निवड झाली आहे. हर्चे प्रशालेत आठवीत प्रवेश घेतल्यापासून या दोघी गावखडीसह विविध ठिकाणी तालुकास्तरावर खेळण्यास जात होत्या. त्यामुळे त्यांच्या खेळात खूप चांगली प्रगती झाली म्हणूनच आज त्यांना राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. संस्थेचे चेअरमन भाई मयेकर, मुख्याध्यापक बाळासाहेब सरक, विलास पाटील, विष्णू पाटील, जयसिंग पाटील आदींनी दोघींचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com